शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मी तुमची मुलगी आहे हे विसरून जा...; आफताबच्या प्रेमात वेडी झालेल्या श्रद्धाने वडिलांचे ऐकले नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 12:54 PM

1 / 8
मुंबईच्या श्रद्धा वाकर खून प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला.या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब पूनावाला डेटिंग अॅपवर सक्रिय होता. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते, त्यावेळी कदाचित आणखी काही महिला, मुली त्याच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
2 / 8
फोटोत दिसणारा आफताब आहे. श्रद्धा मुंबईत होती तेव्हा तिची डेटींग अॅपवरुन आफताबसोबत ओळख झाली. आफताबला भेटल्यानंतर ती कशी बदलली आहे, याचा खुलासा श्रद्धाचे वडील विकास मदन यांनी केला आहे.
3 / 8
आपल्या धर्मात असे केले जात नाही हे समजावण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. 'जेव्हा आम्ही या नात्याला विरोध केला तेव्हा मी तुझी मुलगी आहे हे विसरा असे म्हणत श्रद्धा घरातून निघून गेली, एफआयआरमध्ये म्हटले आहे.
4 / 8
श्रद्धाच्या वडिलांनी सांगितले की, श्रद्धा मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती, तिथे तिची भेट आफताबशी झाली. '8-9 महिन्यांनंतर आम्हाला कळले की ती आफताबसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 2019 आफताबसोबत लिव्ह-इनमध्ये राहायचे आहे, असं श्रद्धाने तिच्या आईला सांगितले.
5 / 8
श्रद्धाचा खून करुन ६ महिने झाले तरीही आफताब पोलिसांच्या हाती लागला नव्हता. 'आता तपास सुरू आहे, त्याला फाशी द्यावी. जर तिचे तुकडे झाले असतील तर त्या आफताबचेही तुकडे करा, असंही श्रद्धाचे वडील म्हणाले.
6 / 8
श्रद्धाशी शेवटचे संभाषण 2021 मध्ये झाले होते. यावेळी वडिलांनी तिला खूप समजावले होते. या मुलाला भेटल्यावर श्रद्धाच्या वागण्यात बदल झाला. त्याआधी ती एकदम नॉर्मल असायची, कोणतीही फॅशन करत नव्हती. ही तिची पहिली नोकरी होती आणि जेव्हा ती आफताबला भेटली तेव्हा तिचे वागणे बदलले.
7 / 8
मला श्रद्धाची तिच्या मित्रांकडून माहिती मिळत होती. श्रद्धाने तिच्या आईजवळ आफचाबची तक्रारही केली होती. भांडतो आणि तिला मारहाण करतो असं सांगितले होते.
8 / 8
मला श्रद्धाची तिच्या मित्रांकडून माहिती मिळत होती. श्रद्धाने तिच्या आईजवळ आफचाबची तक्रारही केली होती. भांडतो आणि तिला मारहाण करतो असं सांगितले होते.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली