शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Murder Case : श्रद्धाला ब्रेकअप करायचे...; आफताब पूनावालाचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 1:37 PM

1 / 10
मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब पूनावाला विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू केला आहे, आफताबची कसून चौकशी करण्यात येत आहे. आफताब पोलिसांजवळ जबाब बदलत असल्याची माहिती समोर आली आहे. आता पोलिसांना श्रद्धा वालकर हत्येतील नवी माहिती मिळाली आहे. आफताबसोबत श्रद्धा ब्रेकअप करणार होती म्हणून त्याने श्रद्धाची हत्या केल्याचे समोर आले आहे.
2 / 10
श्रद्धाला आफताबसोबत ब्रेकअप करायचे होते. याचा आफताबला राग आला आणि त्याने निर्दयीपणे श्रद्धाची हत्या केल्याचे समोर आले आहे. आफताबच्या वागण्याला आणि मारहाणीला श्रद्धा कंटाळली होती. यातून बाहेर पडण्यासाठी श्रद्धाने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. 3-4 मे रोजी श्रद्धाने वेगळे होण्याचा निर्णयही घेतला होता. याच रागातून आफताबने श्रद्धाची हत्या केली.
3 / 10
या प्रकरणातील पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली आहे. आतापर्यंत 13 हाडे सापडली आहेत. बाथरूम आणि किचन, बेडरूममधून रक्ताच्या डागांचे नमुनेही मिळाले आहेत.
4 / 10
दिल्ली पोलिसांनी काही शस्त्रेही जप्त केली आहेत, ही शस्त्रे जंगल आणि आफताबच्या फ्लॅटमध्ये सापडली आहेत. पोलिसांनी गुरुग्राममधून शरीराचे काही अवयवही जप्त केले आहेत.
5 / 10
आफताब श्रद्धाला रोज मारहाण करायचा त्यामुळे श्रद्धाने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनीही 3-4 मे रोजी आपण वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता.
6 / 10
पण, आफताबला याचा राग आला होता, त्याने रागात श्रद्धाची हत्या केली. या प्रकरणात आफताबचा मित्र बद्रीची भूमिका संशयास्पद नाही. त्याने या दोघांना फक्त फ्लॅट दाखवला होता.
7 / 10
दिल्ली पोलिसांकडे अजून एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा सापडलेला नाही. पोलिसांनी फ्लॅटमधून काही कपडे देखील जप्त केले आहेत जे CSFL तपासासाठी पाठवले आहेत, याचा अहवाल अजुनही आलेला नाही.
8 / 10
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मुंबई पोलिसांनी आफताबला चौकशीसाठी बोलावले तेव्हा श्रद्धाचे काही अवयव फ्लॅटमध्ये होते आणि तो पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
9 / 10
1 डिसेंबरला आफताबची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी 1 डिसेंबरला नार्को टेस्ट करण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. यापूर्वी 5 डिसेंबर रोजी नार्को चाचणी घेण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी आफताबची पॉलीग्राफी चाचणीही केली आहे.
10 / 10
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या बेपत्ता झाल्याची तक्रार मुंबईत दाखल करण्यात आली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी आफताबला चौकशीसाठी बोलावले. त्यादरम्यान त्याच्या फ्रीजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरPoliceपोलिस