Shraddha Murder Case: 'दररोज नवीन अनुभव...'; श्रद्धाची 'ती' पोस्ट ठरली अखेरची, दोघंही गेलेले हिमाचल प्रदेशात! By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 9:45 AM
1 / 6 संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणी (Shraddha Walker Murder Case) एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे. 2 / 6 श्रद्धा वालकरचा खून सहा महिन्यांपूर्वी मे महिन्यात झाला, असा पोलिसांचा दावा आहे. तर तिचा मित्र लक्ष्मण नाडार याने आपले जुलैमध्ये श्रद्धाशी संभाषण झाले होते, असे म्हटले आहे. त्यामुळे श्रद्धाचा खून नेमका कधी झाला, की आफताबने पोलिस आणि नाडारची दिशाभूल केली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 3 / 6 मे महिन्यात श्रद्धा आणि आफताब हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेले होते. तेथे काही दिवस दोघंही एकत्र होते. यादरम्यान श्रद्धाने ११ मे रोजी फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला होता. यापोस्टद्वारे तीने ''Exploring More And More Every Passing Day'' असं म्हटलं आहे. ती पोस्ट आता श्रद्धाची अखेरची पोस्ट ठरली आहे. तसेच १६ मे रोजी त्यांचा लिव्ह इन रिलेशनशीपच्या दिवसाचा वाढदिवस होता. त्याचनिमित्ताने दोघंही हिमाचल प्रदेशात फिरायला गेल्याचे सांगण्यात येत आहे. 4 / 6 आफताबने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाने लग्नासाठी तगादा लावल्यामुळे आपण कंटाळून तिची हत्या केल्याची कबूली दिली आहे. तसेच तिचे ३५ तुकडे करुन, दिल्लीच्या परिसरात फेकल्याची माहिती त्याने दिली आहे. 5 / 6 आफताब हा कॉलसेंटरमध्ये काम करण्याअगोदर मुंबई येथे एका मोठ्या हॉटेलमध्ये शेफ होता. त्यामुळे त्याला मांसाचे तुकडे कसे करायचे याबाबत माहित आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने ३०० लिटरचा फ्रिज घेतला होता. त्यात त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे १५ दिवस ठेवले होते. प्रत्येक दिवशी एक दोन तुकडे तो दिल्लीच्या परिसरात फेकत होता. 6 / 6 श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधता यावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला मंगळवारी मेहरौलीच्या जंगलात नेले होते. पोलिसांना आतापर्यंत १२ तुकडे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाचे आहेत, की नाही याची पुष्टी होईल. गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त केला आहे. आणखी वाचा