शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Walker Murder Case: गुजरात, हिमाचल, दिल्लीत कोण जिंकतंय?; आफताबच्या प्रश्नाने कोठडी बाहेरील पोलिसही बुचकळ्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 12:10 PM

1 / 9
श्रद्धा वालकर हत्याकांडमधील आरोपी आफताब पूनावाला सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे. तुरुंगात असताना आफताबचं वागणं हैराण करणारं आहे. तुरुंगात असताना श्रद्धाची हत्या केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्यासारखा तो वागत आहे.
2 / 9
काही दिवसांपूर्वी आफताबाने तुरुंगात वाचणासाठी कांदबरी आणि साहित्याची पुस्तके देण्यााची मागणी केली होती. मात्र आता आफताबला निवडणुकीतही रस असल्याचं दिसून येत आहे.
3 / 9
गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत नुकत्याच निवडणुका पार पडल्या. निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर नेहमीप्रमाणे माध्यमांशी संबंधित राज्यांचे एक्झिट पोल जाहीर केले. याची खबर बहुतेक आफताबलाही पोहचल्याचे दिसून येत आहे.
4 / 9
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब गुजरात, हिमाचल आणि एमसीडी निवडणुकीतही रस घेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने तिहार तुरुंगातील त्याच्या कोठडी बाहेर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांशी बराच वेळ चर्चा केली. एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचल आणि एमसीडीमध्ये कोणाचं सरकार येणार आहे? याबाबत त्याने अनेक प्रश्न तुरुंगातील पोलीस आणि कर्मचाऱ्यांना विचारल्याचे सांगण्यात येत आहे.
5 / 9
आफताबला तिहारमधील इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे, परंतु त्याच्या सेलमध्ये काही कैदीही आहेत. याआधी आफताबला आंबेडकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, या सुनावणीदरम्यान आफताबला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
6 / 9
दरम्यान, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने पोलिस चौकशीदरम्यान जे सांगितले होते तेच त्याने पॉलिग्राफ व नार्को चाचणीदरम्यानही सांगितले. त्याच्या जबाबात कोणताही बदल नाही. त्याने पॉलिग्राफ आणि नार्को चाचणीत तसेच पोलिस चौकशीदरम्यान दिलेली उत्तरे एकसारखी असल्यानं पोलिसही चक्रवाले आहेत.
7 / 9
पॉलिग्राफ चाचणी आणि नार्को चाचणीत आफताबने दिलेल्या उत्तरातून श्रद्धावर खूप प्रेम असल्यासारखं दाखवलं. मात्र श्रद्धावर मोठ्या प्रमाणात राग असल्याचंही आफताबच्या बोलण्यावरुन दिसून आलं. तसेच श्रद्धाची हत्या केल्यानं मला कोणताही पश्चाताप वाटत नसल्याचंही आफताबने चाचणीदरम्यान पोलिसांना सांगितलं. त्यामुळे आफताबचं वागणं पोलिसांना आता त्रासदायक ठरत आहे. आफताबच्या या गोंधळ्यात टाकणाऱ्या वागण्यानं अधिकारीही हैराण झाले आहेत.
8 / 9
१८ आणि १९ मे रोजी श्रद्धा वालकरचे शेवटचे लोकेशन मेहरौलीतील छतरतुर येथे होते. मेहरौली पोलिसांना मिळालेल्या श्रद्धाच्या मोबाईलच्या लोकेशनवरून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र श्रद्धाचा मोबाईल अद्याप पोलिसांना जप्त करण्यात यश आलेले नाही. आफताब सांगतो की, तो जूनमध्ये मुंबईला गेला होता, तेव्हा वाटेत त्याने श्रद्धाचा मोबाईल फेकून दिला होता. आफताबने सप्टेंबरमध्ये त्याचा मोबाईल बदलण्याचा निर्णय घेतला. त्याने जुना मोबाईल OLXवर विकून त्याच क्रमांकाचे सीमकार्ड घेतले होते. हा मोबाईल देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
9 / 9
मुंबई पोलिसांनी आफताबची चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिले. त्यावेळी मुंबई पोलिसांना या प्रकरणाचे गांभीर्य समजले नाही. त्यामुळे आरोपी आफताबला पुरावे नष्ट करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांनी आरोपी आफताबला सप्टेंबरमध्ये चौकशीसाठी बोलावल्याचेही तपासात समोर आले आहे. तोपर्यंत आफताबने श्रद्धाचे डोकं आणि धड फ्रीजमध्ये ठेवले होते. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपींना सोडून दिले. मुंबई पोलिसांनी आरोपींची कडक चौकशी केली असती तर दिल्ली पोलिसांना पुरावे गोळा करण्यासाठी भटकावे लागले नसते.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022delhiदिल्लीHimachal Pradeshहिमाचल प्रदेश