शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पॉलिग्राफ टेस्टआधी आफताब वेळेवर म्हणातो, 'माझी तब्येत ठीक नाहीय'; नेमकं काय झालं?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 11:36 AM

1 / 7
लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याप्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला दिल्ली कोर्टाने मंगळवारी चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देत त्याच्या पॉलिग्राफ चाचणीस परवानगी दिली.
2 / 7
लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याप्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला दिल्ली कोर्टाने मंगळवारी चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देत त्याच्या पॉलिग्राफ चाचणीस परवानगी दिली.
3 / 7
आफताबची आज पॉलिग्राफ चाचणी करण्यात येणार होती. मात्र वेळेवर आफताबने आपली तब्येत ठीक नसल्याचं पोलिसांना सांगितलं. यानंतर आता उद्या म्हणजेच २५ नोव्हेंबर रोजी आफताबची पॉलिग्राफ चाचणी होण्याची शक्यता आहे.
4 / 7
सदर प्रकरणाचा तपास करणारे दिल्ली पोलीस वसईत दाखल झाले आहेत. वसईमध्ये दिल्ली पोलिसांनी आफताब आणि श्रद्धा यांचे शेजारी, मित्रपरिवाराची चौकशी केली आहे. त्याशिवाय डेटिंग अॅपवरून आफताबला भेटलेल्या तीन तरुणींची चौकशी दिल्ली पोलिसांनी केली. वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात ही चौकशी करण्यात आली.
5 / 7
पोलिसांकडून श्रद्धाचे मित्र-मैत्रिणी, कार्यालयातले सहकारी, नातेवाईक असे अंदाजे २० हून अधिक लोकांचे जबाब घेतले गेले आहेत. बहुतेक जणांनी त्यांच्या श्रद्धासोबत केलेले चॅट किंवा कॉलबाबतची माहिती आणि पुरावे पोलिसांना दिले आहेत.
6 / 7
दरम्यान, श्रद्धाचा मृत्यू होण्याच्या काही तासांपूर्वी तिने तिच्या मित्राला मेसेज केला होता. ती चॅट आता समोर आली आहे. श्रद्धाने १८ मे रोजी सायंकाळी मित्राला मेसेज केला होता. परंतु ही शेवटची चॅट असेल, असं श्रद्धानेही विचार केला नसेल. श्रद्धाने मित्राला मेसेज करुन म्हटलं होतं की, 'I Have Got News' म्हणजेच 'माझ्याकडे एक माहिती आहे'. श्रद्धाने यानंतर आणखी एक मेसेज केला आहे, त्यामध्ये 'मी एक गोष्टीमध्ये खूप व्यस्त आहे', असंही म्हटलं आहे. मात्र या मेसेजवरुन श्रद्धाला काहीतरी सांगायचे होते, असं दिसून येत आहे.
7 / 7
श्रद्धाने स्वहस्ते लिहिलेली पोलिस तक्रारीची प्रत बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. नोव्हेंबर २०२० मध्ये तुळींज पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीमध्ये ‘आफताब आपणास सहा महिन्यांपासून मारहाण करीत असून, त्याने आपल्या शरीराचे तुकडे करून फेकून देईन,’ अशी धमकी दिली असल्याचे नमूद आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये श्रद्धाला आफताबने एव्हरशाईन - वसई येथे राहत असताना गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी अर्ज देण्यास सांगून मेडिकल करून येण्यास सांगितले होते. पण, तिने याकडे कानाडोळा केला.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरPoliceपोलिसDeathमृत्यू