शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Walker Murder Case: आफताबचं ते वागणं आता पोलिसांना ठरतंय त्रासदायक; ठरवून करतोय?, अधिकारीही हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 11:54 AM

1 / 8
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने पोलिस चौकशीदरम्यान जे सांगितले होते तेच त्याने पॉलिग्राफ व नार्को चाचणीदरम्यानही सांगितले. त्याच्या जबाबात कोणताही बदल नाही. त्याने पॉलिग्राफ आणि नार्को चाचणीत तसेच पोलिस चौकशीदरम्यान दिलेली उत्तरे एकसारखी असल्यानं पोलिसही चक्रवाले आहेत.
2 / 8
पॉलिग्राफ चाचणी आणि नार्को चाचणीत आफताबने दिलेल्या उत्तरातून श्रद्धावर खूप प्रेम असल्यासारखं दाखवलं. मात्र श्रद्धावर मोठ्या प्रमाणात राग असल्याचंही आफताबच्या बोलण्यावरुन दिसून आलं. तसेच श्रद्धाची हत्या केल्यानं मला कोणताही पश्चाताप वाटत नसल्याचंही आफताबने चाचणीदरम्यान पोलिसांना सांगितलं. त्यामुळे आफताबचं वागणं पोलिसांना आता त्रासदायक ठरत आहे. आफताबच्या या गोंधळ्यात टाकणाऱ्या वागण्यानं अधिकारीही हैराण झाले आहेत.
3 / 8
आफताबने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून दिल्लीच्या जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावल्याचे कबूल केले. आफताब पूनावाला नार्को चाचणीदरम्यान वारंवार बेशुद्ध पडत होता. श्रध्दाच्या मोबाईलबद्दल त्याला विचारले असता, तिने फोन कुठेतरी फेकून दिल्याचे आरोपीने सांगितले. त्याने करवतीचा वापर करून श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली दिली.
4 / 8
श्रद्धाने आपल्याला सोडून जाण्याची धमकी दिली होती. यामुळे तो संतापला आणि त्याने श्रद्धाची हत्या केली. याशिवाय आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कसे केले आणि त्याची विल्हेवाट कशी लावली हेही सांगितले. डॉक्टरांनी आफताबला विचारले की त्याने श्रद्धाचे शिर कुठे लपवले आहे, तेव्हा तो ते ठिकाण सांगू शकला नाही. शिर नक्की कुठे लपवले होते हे त्याला आठवत नव्हते.
5 / 8
खून प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, या प्रश्नावर आफताबने हे कृत्य एकट्याने केल्याचं सांगितलं. तथापि, पोलिसांना अद्याप श्रद्धाची कवटी सापडलेली नसून, शरीराच्या इतर भागांसह कवटीचाही शोध सुरू आहे.
6 / 8
आफताबाने तुरुंगात वाचणासाठी कांदबरी आणि साहित्याची पुस्तके देण्यााची मागणी प्रशासनास केली आहे. यावर तुरुंग प्रशासनाकडून लवकरच त्याला पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशी माहिती तिहार तुरुंगातील सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आफताबला द ग्रेट रेल्वे बाजार नावाची कादंबरी वाचायला दिली जाऊ शकते.
7 / 8
१८ आणि १९ मे रोजी श्रद्धा वालकरचे शेवटचे लोकेशन मेहरौलीतील छतरतुर येथे होते. मेहरौली पोलिसांना मिळालेल्या श्रद्धाच्या मोबाईलच्या लोकेशनवरून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र श्रद्धाचा मोबाईल अद्याप पोलिसांना जप्त करण्यात यश आलेले नाही. आफताब सांगतो की, तो जूनमध्ये मुंबईला गेला होता, तेव्हा वाटेत त्याने श्रद्धाचा मोबाईल फेकून दिला होता. आफताबने सप्टेंबरमध्ये त्याचा मोबाईल बदलण्याचा निर्णय घेतला. त्याने जुना मोबाईल OLXवर विकून त्याच क्रमांकाचे सीमकार्ड घेतले होते. हा मोबाईल देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
8 / 8
मुंबई पोलिसांनी आफताबची चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिले. त्यावेळी मुंबई पोलिसांना या प्रकरणाचे गांभीर्य समजले नाही. त्यामुळे आरोपी आफताबला पुरावे नष्ट करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांनी आरोपी आफताबला सप्टेंबरमध्ये चौकशीसाठी बोलावल्याचेही तपासात समोर आले आहे. तोपर्यंत आफताबने श्रद्धाचे डोकं आणि धड फ्रीजमध्ये ठेवले होते. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपींना सोडून दिले. मुंबई पोलिसांनी आरोपींची कडक चौकशी केली असती तर दिल्ली पोलिसांना पुरावे गोळा करण्यासाठी भटकावे लागले नसते.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरDeathमृत्यूPoliceपोलिस