शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Walker Murder Case: आफताबची पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण; मात्र हे ४ प्रश्न अजूनही अनुत्तरीत, नार्कोसाठी ठेवले राखून?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 1:14 PM

1 / 7
श्रद्धा हत्याकांड प्रकरणी आता हळूहळू आफताबने खेळलेला गेम त्याच्यावरच उलटू लागला आहे. आफताबची पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण झाली आहे, या टेस्टमध्ये त्याला २५० प्रश्न विचारण्यात आले होते. यात आफताबने पूर्ण आत्मविश्वासाने उत्तरे दिली आहेत. यामुळे आफताबच्या या टेस्टचा निकाल काय येतो यावर पोलिसांचे पुढील फासे अवलंबून आहेत.
2 / 7
पोलिसांना आफताबच्या पॉलिग्राफिक टेस्टमध्ये सध्या तरी काही यश मिळालेले नाही. आफताबने गुन्हाचा सिक्वेन्स आणि पुरावे लपविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे पोलिसांना आता घटनाक्रम आणि पुरावे जुळवावे लागणार आहेत.
3 / 7
पॉलिग्राफिक टेस्टमध्ये आफताबने अनेक गोष्टींचा खुलासा केला असला, तरी अजूनही महत्वाचे ४ प्रश्न अनुत्तरीत आहेत. १. श्रद्धाचं डोकं कुठे फेकलं?, २. श्रद्धाच्या बाकीच्या शरिराचा भाग कुठे?, ३. श्रद्धाचा मोबाईल कुठे आहे?, ४. श्रद्धाची जेव्हा हत्या केली, त्यावेळीचे तिचे कपडे कुठे आहेत? या प्रश्नाची उत्तरे अजूनही समोर आलेली नाहीय. परंतु नार्को टेस्ट दरम्यान ही महत्वाची प्रश्न आफताबला विचारणार असल्याचं समोर येत आहे.
4 / 7
आफताबचे वकील अबिनाश कुमार यांनी सांगितले की, त्याला १ आणि ५ डिसेंबरला फॉरेन्सिक सायन्स लॅब, रोहिणी येथे नेण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला होता. त्याला परवानगी दिली आहे. रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये एफएसएलच्या (न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा) तज्ज्ञ पथकाकडून ही चाचणी होणार आहे.
5 / 7
नार्को टेस्टमध्ये सोडियम पेंटोथल, स्कोपोलामाइन आणि सोडियम एमायटल या औषधांचा उपयोग करण्यात येतो. ज्यामुळे ती व्यक्ती संमोहन अवस्थेत राहते आणि खरी माहिती सांगण्याची शक्यता असते. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार, नार्को, ब्रेन मॅपिंग व पॉलिग्राफ चाचण्या व्यक्तीच्या सहमतीशिवाय करता येत नाहीत. मंगळवारीही आफताबची पॉलिग्राफ चाचणी झाली.
6 / 7
आधीपासूनच तयारी होती. आफताबची सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे तुरुंग प्रशासनानं आवश्यक सर्व व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आफताबला वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याच्या सेलमध्ये आफताबसोबत इतर कोणताही कैदी नाही. तसंच सेलच्या बाहेर २४ तास एक पोलीस हवालदार तैनात असतो. जो त्याच्यावर नजर ठेवून आहे. आफताबला ठेवण्यात आलेला सेल असा आहे की ज्यातून कैद्याला लवकर बाहेर काढता येत नाही. सीसीटीव्ही कॅमेराची देखील आफताबवर नजर आहे. आफताबला जेवण देण्याआधी जेवणाचीही तपासणी केली जाते.
7 / 7
श्रद्धा हत्याप्रकरणाबाबत जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. यातच पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले आहेत की जीची आफताबसोबत नकळतपणे भेट झाली होती. तिच्याकडून काहीतरी माहिती मिळेल या हेतूनं पोलिसांनी प्रयत्न केला. आफताब एका डेटिंग अॅपचा वापर करत होता. त्यामाध्यमातून त्यानं अनेक मुलींशी मैत्री केली होती. याच डेटिंग अॅपच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या एका मुलीला त्यानं आपल्या घरी बोलावलं होतं. पोलिसांनी याच मुलीचा शोध घेतला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही मुलगी व्यवसायानं मानसोपचारतज्त्र आहे. पोलिसांनी तिची चौकशी केली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार तिच्याकडून आफताबबाबत काही महत्वाचे धागेदोरेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरDeathमृत्यूPoliceपोलिस