शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Walker Murder Case : ब्लीच, चॉपिंग बोर्ड, ग्लास क्लिनर...; हत्येचे पुरावे पुसण्यासाठी आफताबने केलेली ऑनलाईन शॉपिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 3:32 PM

1 / 12
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाचे धक्कादायक कृत्य उघड झाले आहे. हत्येच्या हेतूपासून ते कटापर्यंतचा संपूर्ण उलगडा पोलिसांनी केला आहे. हत्येनंतर आफताबने आपल्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले तेव्हा सर्वत्र रक्तच होते.
2 / 12
पुरावा पुसण्यासाठी आफताबने ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून साफसफाईसाठी लागणारं सामान मागवलं. 18 मे 2022 रोजी गुरुग्राममध्ये एक रात्र घालवल्यानंतर श्रद्धा सकाळी परत छतरपूरला आफताबकडे पोहोचली. आफताबने श्रद्धाला तिच्या नवीन मित्राबाबत विचारपूस केली असता त्यांच्यात मोठे भांडण झाले. पण काही वेळातच दोघेही शांत झाले.
3 / 12
रात्रीचे जेवण झाल्यावर श्रद्धाने आफताबला वसई (मुंबई) येथे जाण्यास सांगितले. जेणेकरून तो तेथे भाड्याच्या घरात ठेवलेले सामान दिल्लीत आणू शकेल. वसईला जाण्यासाठी आफताबचे तिकीटही काढले होते. मात्र आफताबने तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगून वसईला जाण्यास नकार दिला.
4 / 12
दोघांमध्ये या मुद्द्यावरून पुन्हा वाद सुरू झाला. त्यावेळी श्रद्धाने आफताबला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संतापलेल्या आफताबने तिला उचलून जमिनीवर आपटले आणि तिचा गळा दाबून खून केला. त्याचा परिणाम असा झाला की काही वेळातच श्रद्धाचा मृत्यू झाला.
5 / 12
आफताबने यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना सुरू केली. त्याला आधी तिचा मृतदेह एका बॅगेत टाकून हिमाचल प्रदेशात विल्हेवाट लावायची होती. त्यासाठी त्याने 1200 रुपये किमतीची काळ्या रंगाची मोठी बॅगही खरेदी केली होती.
6 / 12
कॅब बुक करण्यासाठी आफताब काही ट्रॅव्हल एजंटशीही बोलला होता. पण मग त्याने विचार केला की हिमाचलच्या रस्त्यावर ठिकठिकाणी चेकिंग केली जाते, चेकिंग दरम्यान मृतदेहासोबत पकडले जाऊ नये. त्यामुळे त्याने आपला प्लॅन रद्द केला. त्याने श्रद्धाचा मृतदेह बाथरूममध्ये लपवून ठेवला.
7 / 12
हिमाचलला जाण्याचा प्लॅन रद्द केल्यानंतर आफताबने ठरवले की तो श्रद्धाच्या मृतदेहाचे छोटे तुकडे करायचे आणि एका मोठ्या ब्रीफकेसमध्ये ठेवायचे आणि कुठेतरी फेकायचे. यानंतर त्याने एक करवत विकत घेतली. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले केले.
8 / 12
दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 मे रोजी आफताबने छतरपूरमधील दुसरे दुकान गाठले आणि तेथून फ्रीज विकत घेतला. त्याचे पैसे सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डमधून 25 हजार रुपये देऊन भरले. दुकानदाराने 19 मे रोजी सायंकाळीच फ्रिज घरी पाठवला होता.
9 / 12
मृतदेहाचे तुकडे केल्यामुळे बाथरूममध्ये रक्त पसरले होते. हत्येचे पुरावे पुसून टाकण्याचा तो विचार करत होता. यामुळे त्याने बिलिंकिट शॉपिंग अॅपवरून हार्पिक टॉयलेट क्लीनरच्या दोन बाटल्या, ब्लीचच्या 500 मिली बॉटल खरेदी केल्या.
10 / 12
एक चॉपिंग बोर्ड, ग्लास क्लीनरच्या दोन बाटल्या आणि एक गोदरेज हँड वॉशची देखील ऑर्डर दिली. 19 मे रोजी रात्री 10.30 च्या सुमारास सर्व सामान आल्यावर त्याने बाथरूमचा फरशी पूर्णपणे स्वच्छ केली होती.
11 / 12
श्रद्धाच्या हत्येच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 20 मे रोजी आफताबने मेहरौली मार्केटमधून लाल रंगाची मोठी बॅग खरेदी केली. दोन हजार रुपये किमतीच्या या बॅगेसाठी त्यांनी गुगल पेद्वारे पैसे भरले होते. मृतदेहाचे सर्व तुकडे या पिशवीत टाकल्यानंतर ही पिशवी कुठेतरी फेकून द्यावी, असा आफताबचा विचार होता.
12 / 12
मोठी बॅग आणि वजन जास्त असल्याने तो पकडले जाण्याची भीती जास्त होती. त्यामुळेच त्याने आपला विचार बदलला. आता त्याने ठरवले आहे की तो मृतदेहाचे छोटे तुकडे कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये टाकून वेगवेगळ्या ठिकाणी टाकायचे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी