शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबचा कुटुंबीयांना भेटण्यास नकार; जेलमध्ये नेमकं करतो काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 11:40 AM

1 / 14
मुंबईचा आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे 35 तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक-एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
2 / 14
श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप असलेला आफताब आता त्याच्या कुटुंबीयांना भेटू इच्छित नाही. तिहार तुरुंगात असलेल्या आफताबने आपल्या कुटुंबीयांना भेटण्यास नकार दिला आहे.
3 / 14
आफताब पूनावाला आत्तापर्यंत त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा मित्राला भेटलेला नाही, इतकेच नाही तर तो फोनवर देखील कोणाशीही बोलला नाही. तो तुरुंगात स्वतःमध्ये मग्न राहतो आणि पुस्तकं वाचत राहतो. तुरुंग अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
4 / 14
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जेल अधिकाऱ्यांनी सांगितले की, आफताब पूनावाला (28) हा 26 नोव्हेंबरपासून तिहार तुरुंगात आहे, परंतु त्याने अद्याप तुरुंग प्रशासनाला त्याच्या कुटुंबीयांची किंवा मित्रांची नावे सादर केलेली नाहीत, जे त्याला तुरुंगात भेटू शकतील, आफताबने इतर कैद्यांना सांगितले की, तो या आठवड्याच्या शेवटी कोणालातरी भेटू शकतो.
5 / 14
आफताबने अद्याप भेटणाऱ्याच्या नावाचा तपशील कारागृह प्रशासनाला दिलेला नाही. जेल मॅन्युअलनुसार, प्रत्येक कैद्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना आठवड्यातून दोनदा कारागृहाच्या मुलाखत कक्षात भेटण्याची परवानगी आहे.
6 / 14
कैद्याला कोणत्याही बाहेरील व्यक्तीला भेटण्याची परवानगी देण्यापूर्वी, कारागृह अधीक्षक कुटुंबातील सदस्य आणि मित्रांची यादी सादर करतात आणि त्यांची पडताळणी करतात आणि त्यानंतरच आठवड्यातून दोनदा कारागृहाला भेट देण्याची लेखी परवानगी देतात आणि कैद्याला भेटण्याची परवानगी देतात.
7 / 14
रिपोर्टनुसार, तुरुंगातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आफताब पूनावालाला दोन कैद्यांसह एका सेलमध्ये ठेवले आहे, जिथे तो चोवीस तास सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असतो. आफताब स्वत:ला हानी पोहोचवायला नको किंवा इतर कैद्यांकडून त्याच्यावर हल्ला होणार नाही याचीही काळजी घेत आहेत.
8 / 14
सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याच्यावर नजर ठेवणाऱ्या आमच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की तो त्याच्या सहकारी कैद्यांशी फार कमी बोलतो. तो त्याच्या सेलमध्ये वाचण्यात वेळ घालवतो. आमच्या अधीक्षकांनी आफताबला भेटण्याच्या आणि फोन वापरण्याच्या नियमांची माहिती दिली आहे, पण तो म्हणाला की त्याला कोणाशीही भेटायचे नाही किंवा बोलायचे नाही.
9 / 14
आफताब पूनावालाच्या या वागण्याने जेल अधिकारी देखील आश्चर्यचकित झाले आहेत कारण तो फोनवरही त्याच्या कुटुंबीयांशी बोलत नाही. एवढेच नाही तर त्याने जामीन अर्ज मागे घेतला आहे, जो त्याच्या वकिलाने गेल्या आठवड्यात न्यायालयात दाखल केला होता. तुरुंगात आफताब फक्त त्याच्या वकिलाशी बोलतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 14
आफताबवर जेलमध्ये करडी नजर ठेवण्यात येत आहे. आफताब सध्या तिहार जेलमध्ये बंद असून तो आत्महत्या करू शकतो अशी भीती पोलिसांना आहे. यामुळे आफताबवर नीट लक्ष ठेवलं जात असल्याचं माहिती समोर आली आहे. आफताब स्वत:ला नुकसान पोहोचवू शकतो अशी कोणतीही गोष्ट त्याच्या जवळ ठेवू नका अशा सूचनाच जेलमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
11 / 14
आफताबचा विक्षिप्त स्वभाव लक्षात जेल प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे. पोलीस कोठडीत आफताब अत्यंत शांत असल्याने पोलिसांना आश्चर्यही वाटत आहे. आफताबच्या कोठडीत दोन कैद्यांना ठेवण्यात आलं असून, त्यांनाही त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून लगेचच जंगलात फेकले नाही.
12 / 14
चौकशीत आफताबने सांगितले की, त्याने सुमारे 4 महिने श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. एवढेच नाही तर हे तुकडे जंगलात टाकता येतील अशी कल्पना त्याला त्याच्या मित्राच्या घरी सुचली. आफताबने पोलिसांना सांगितले की, श्रद्धाच्या हत्येनंतर तिच्या तुकड्याची विल्हेवाट कशी लावायची हे तो ठरवू शकला नाही.
13 / 14
एके दिवशी त्याच्या मित्राच्या घराच्या गच्चीवर फिरत असताना त्याला छत्तरपूरचे जंगल दिसले आणि श्रद्धाचे तुकडे इथेच टाकावेत असे वाटले. त्यानंतर त्याने अनेक दिवस घेऊन हे काम पूर्ण केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत आफताबने चायनीज चॉपरने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचं समोर आलं आहे.
14 / 14
आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर सर्वात प्रथम तिच्या हाताचे तुकडे केले होते. नार्को टेस्टमध्ये त्याने तुकडे फेकून दिल्याचं सांगितलं. पोलीस आता त्या लोकेशनवर जाऊन हत्याराचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आफताबच्या फ्लॅटमधून अनेक धारदार हत्यारं जप्त केल्याचा दावा केला आहे. या हत्यारांचा वापर हा श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी केला गेला.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी