शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Walker Murder Case: आफताब शब्दन् शब्द खरे बोललेला; पण ती पाच हाडे कोणाची; श्रद्धाचे डीएनए जुळलेच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 7:19 AM

1 / 7
श्रद्धा हत्याकांडात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. छतरपूरच्या जंगलात पोलिसांना केसही सापडले होते. श्रद्धाचे वडील विकास यांच्या डीएनएशी ते जुळले आहेत. आफताबच्या छतरपूर फ्लॅटच्या किचनमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात सुकलेले रक्त सापडले होते. तेदेखील डीएनएशी जुळले आहे.
2 / 7
पॉलिग्राफ चाचणीदरम्यान आफताबला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासाशी जुळली आहेत. आरोपी पॉलिग्राफ चाचणीत खरे बोलला, असे तपास अधिकारी मानत आहेत. त्याने दिलेल्या बहुतेक प्रश्नांच्या उत्तरातील माहिती अचूक निघाली. जंगलात सापडलेल्या २३ हाडांपैकी ५ हाडे श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळत नाहीत. 
3 / 7
चाचणीदरम्यान सुमारे ३५ प्रश्न विचारण्यात आले. यापैकी बहुतांश प्रश्नांची अचूक उत्तरे आरोपीने दिली. आरोपीने चौकशीदरम्यान दिलेलीच उत्तरे पॉलिग्राफ चाचणीत दिली आहेत.
4 / 7
श्रद्धा कोण होती, तिची आरोपीशी मैत्री कशी होती, श्रद्धाचा खून का केला, कसा केला, मृतदेहाचे किती तुकडे केले, करवत आणि चाकू कुठे फेकले, किती मुलींशी मैत्री होती वगैरे प्रश्न त्याला विचारले गेले.
5 / 7
आफताब पूनावालाच्या जामीन अर्जावर आता गुरुवारी (दि. २२) सुनावणी होणार आहे. जामीन अर्ज शनिवारी सुनावणीसाठी आला होता.
6 / 7
तेव्हा आपण वकीलपत्रावर स्वाक्षरी केली आहे; परंतु जामीन अर्ज दाखल केला जाईल, याची कल्पना नव्हती, असे आफताबने शनिवारी दिल्ली न्यायालयात सांगितले.
7 / 7
आफताबने श्रद्धाचा खून नेमका का केला, त्याचा हत्येमागील हेतू काय हाेता. याचा उलगडा पाेलिसांना अद्याप झालेला नाही.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर