शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Walker Murder Case: श्रद्धाचं शिर तलावात टाकल्याची आफताबची कबुली; पाणी उपसणे सुरु, पाणबुड्यांनाही केले पाचारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 8:36 AM

1 / 7
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे.
2 / 7
आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान त्याने पुन्हा एकदा नवीन खुलासा केला आहे. शिर एका तलावात टाकल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. त्यानंतर पोलिसांनी रविवारी सायंकाळी छतरपूर जिल्ह्यात मैदान गढी तलावातील पाणी उपसणे सुरू केले.
3 / 7
पाणबुड्यांनाही पाचारण केले आहे. मेहरौली जंगलातून पोलिसांनी आतापर्यंत १७ हाडे जप्त करून तपासणीसाठी पाठवली आहेत.
4 / 7
आज आफताबची नार्को टेस्टही होऊ शक्यता आहे. यासाठी प्रश्नांची यादी बनविली आहे. हत्येचा सीन रिक्रिएट करण्यासाठी पोलिस आफताबच्या घरी आले होते.
5 / 7
दिल्ली पोलिसांना १८ ऑक्टोबरचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. यामध्ये श्रद्धाचा खून करणाऱ्या आफताबच्या हातात बॅग दिसत आहे. आफताब १८ ऑक्टोबर रोजी श्रद्धाच्या विकृत मृतदेहाचे उरलेले तुकडे फेकण्यासाठी गेला असावा असा पोलिसांना संशय आहे.
6 / 7
श्रद्धा आणि आफताब यांचे सुरुवातीपासूनच भांडणं सुरु होती. २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. आफताब हा गळा दाबून मारहाण करत असल्याची तक्रार श्रद्धाने नालासोपारा पूर्वमधील तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र १९ डिसेंबर २०२० रोजी श्रद्धाने ही तक्रार मागे घेतली असल्याचे समोर आले आहे.
7 / 7
दरम्यान, श्रद्धा हिच्या हत्येच्या दिवशी तिचा लिव्ह इन पार्टनर आफताबला गांजा ओढण्याचे व्यसन होते. श्रद्धा त्याला नेहमी ओरडायची. त्यावरून अनेकदा त्यांचे भांडण व्हायचे. श्रद्धाची हत्या झाली, त्या दिवशी आरोपी आफताब हा गांजाच्या नशेत होता, अशी कबुली त्याने दिल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरPoliceपोलिस