शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Walker Murder Case : नवा ट्विस्ट! प्रेम, भांडण, हत्या, 35 तुकडे अन् कट...; श्रद्धा-आफताबध्ये येणारा कोण होता 'तो' तिसरा?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 2:34 PM

1 / 14
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रात पोलिसांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. हत्येनंतर आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाच्या मृतदेहाचे छोटे तुकडे केले. हत्येचा हेतूही आता स्पष्ट झाला आहे. पण आता प्रश्न असा आहे की श्रद्धाचा तो नवा मित्र नेमका कोण होता? ज्याच्यामुळे आफताबसोबत भांडण झालं होतं.
2 / 14
आफताफने यानंतर श्रद्धाला बेदम मारहाण केली होती आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. आज तक/इंडिया टुडेला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, श्रद्धा वालकर तिच्या मोबाईलमध्ये एक एप्लिकेशन वापरत होती. ज्याचे नाव आहे बंबल App. हे एक सामाजिक आणि डेटिंग App आहे.
3 / 14
ज्यावर अनोळखी लोक एकमेकांशी मैत्री करतात. या एप्लिकेशनच्या मदतीने ती हरियाणातील गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला भेटली. 17 मे 2022 रोजी श्रद्धा त्याच मित्राला भेटण्यासाठी गुरुग्रामला जात होती. त्या दिवशी सकाळीच ती घरातून निघून गेली होती.
4 / 14
गुरुग्रामच्या या मित्राला भेटण्यासाठी श्रद्धा पहिल्यांदाच बाहेर गेली होती. हेच App होते ज्याद्वारे श्रद्धा आफताब अमीन पूनावालाला देखील भेटली होती. त्या दिवशी श्रद्धा घरी परतली नाही. आफताब तिची वाट पाहत राहिला. कदाचित ती फोनवरही प्रतिसाद देत नव्हती. हेच कारण होते की तो रात्रभर अस्वस्थ होता.
5 / 14
दुसर्‍या दिवशी म्हणजेच 18 मे रोजी सकाळी 11 वाजता श्रद्धा छदरपूरमधील फ्लॅटमध्ये परतली. 18 मे रोजी श्रद्धा फ्लॅटमध्ये प्रवेश करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे. जेव्हा श्रद्ध परत आली तेव्हा आफताब खूप रागावला होता. त्याने रात्री कुठे होती हे विचारलं. पण श्रद्धाने प्रतिसाद दिला नाही.
6 / 14
दोघांमध्ये मोठं भांडण झालं. यानंतर श्रद्धा आणि आफताब सामान्य झाले, तेव्हा दोघांनीही एकत्र जेवण केलं. पण यानंतर, पुन्हा दोघांमध्ये भांडण झालं आणि आफताबने तिला ठार मारलं. श्रद्धाच्या त्या मित्राचे नाव पोलिसांनी सांगितले नाही.
7 / 14
मंगळवारी दिल्ली पोलिसांचे पोलीस आयुक्त (साऊथ रेंज) मीनु चौधरी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांच्या 9 पथकांची स्थापना केली असल्याचे माहिती दिली होती. या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती केवळ दिल्लीच नव्हे तर चार राज्यांपर्यंत पसरली. दिल्ली व्यतिरिक्त महाराष्ट्र, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांचाही समावेश होता.
8 / 14
हत्येनंतर आफताबने श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे सह आयुक्त मीनू चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे मृतदेहाचे तुकडे बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आली होती. त्या पथकाने आफताबच्या सांगण्यावरून हे तुकडे जप्त केले होते.
9 / 14
आरोपी आफताब अमीन पूनावालाची एक नाही तर वेगवेगळ्या टीमने चौकशी केली. या प्रकरणात तज्ज्ञांनाही चौकशीसाठी समाविष्ट करण्यात आले होते. एफएसएल (FSL) आणि सीएफएसएलकडूनही (CFSL) गुन्ह्याचा तपास करण्यात आला.
10 / 14
मीनू चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी आफताबची नार्को आणि पॉलीग्राफ चाचणीही करण्यात आली होती. यासोबतच गुरुग्राम आणि दिल्लीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पुरावा म्हणून घेण्यात आले. एवढेच नाही तर आफताबचा लॅपटॉप, सोशल मीडिया असे डिजिटल पुरावेही जप्त करण्यात आले आहेत.
11 / 14
श्रद्धाचा मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी विविध प्रकारची शस्त्रे वापरण्यात आली होती, त्यातील काही शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.चौधरी यांच्या म्हणण्यानुसार सर्व पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दीडशेहून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. ज्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.
12 / 14
17 मे 2022 रोजी श्रद्धा तिच्या दुसऱ्या मित्राला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेली होती. यानंतर ती 18 मे 2022 रोजी दुपारी परतली. याचा राग आफताबला आला. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले आणि आफताबने तिची हत्या केली.
13 / 14
आरोपी आफताब आपल्या वकिलावर नाराज असलेला दिसत आहे. त्याला या प्रकरणाचे आरोपपत्र त्याच्या वकिलाला दाखवायचे नाही. त्याने आपला वकील बदलण्याबाबत सांगितले आहे. आफताबची न्यायालयीन कोठडी 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
14 / 14
या प्रकरणात पोलिसांनी आफताबची नार्को टेस्ट केली होती. त्यापूर्वी पॉलीग्राफी चाचणीही झाली. त्याला अनेक प्रकारचे प्रश्नोत्तरे विचारण्यात आली, त्यानंतर आरोपपत्र तयार करण्यात आले. आफताबने त्याच्याकडून आरोपपत्राची प्रत मागितली आहे. त्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांनी या मागणीवर 7 फेब्रुवारीला दखल घेतली जाईल, असे स्पष्टपणे सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर