शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Walker Murder Case: पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा श्रद्धाचं डोकं अन् धड फ्रिजमध्येच; मोबईल, सीम, OLX...महत्वाचे पुरावे हाती!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 11:42 AM

1 / 12
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने पोलिस चौकशीदरम्यान जे सांगितले होते तेच त्याने पॉलिग्राफ व नार्को चाचणीदरम्यानही सांगितले. त्याच्या जबाबात कोणताही बदल नाही. त्याने पॉलिग्राफ आणि नार्को चाचणीत तसेच पोलिस चौकशीदरम्यान दिलेली उत्तरे एकसारखी आहेत.
2 / 12
आफताबने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून दिल्लीच्या जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावल्याचे कबूल केले. तथापि, पोलिसांना अद्याप श्रद्धाची कवटी सापडलेली नसून, शरीराच्या इतर भागांसह कवटीचाही शोध सुरू आहे. आफताबचे नार्को चाचणीनंतरचे मुलाखत सत्र (पोस्ट नार्को इंटरव्यू सेशन) शुक्रवारी पूर्ण झाले. हे सत्र दोन तास चालले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
3 / 12
१८ आणि १९ मे रोजी श्रद्धा वालकरचे शेवटचे लोकेशन मेहरौलीतील छतरतुर येथे होते. मेहरौली पोलिसांना मिळालेल्या श्रद्धाच्या मोबाईलच्या लोकेशनवरून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र श्रद्धाचा मोबाईल अद्याप पोलिसांना जप्त करण्यात यश आलेले नाही. आफताब सांगतो की, तो जूनमध्ये मुंबईला गेला होता, तेव्हा वाटेत त्याने श्रद्धाचा मोबाईल फेकून दिला होता.
4 / 12
आफताबने सप्टेंबरमध्ये त्याचा मोबाईल बदलण्याचा निर्णय घेतला. त्याने जुना मोबाईल OLXवर विकून त्याच क्रमांकाचे सीमकार्ड घेतले होते. हा मोबाईल देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
5 / 12
मुंबई पोलिसांनी योग्यवेळी श्रद्धा हत्याकांडात वेळीच कारवाई केली असती तर कदाचित आरोपी आफताबच्या भाड्याच्या घरातील फ्रीजमध्ये डोकं आणि धड सापडले असते. दिल्ली पोलिसांना पुरावे गोळा करण्यासाठी फार कष्ट करावे लागले नसते, असं बोललं जात आहे.
6 / 12
मुंबई पोलिसांनी आफताबची चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिले. त्यावेळी मुंबई पोलिसांना या प्रकरणाचे गांभीर्य समजले नाही. त्यामुळे आरोपी आफताबला पुरावे नष्ट करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला.
7 / 12
दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांनी आरोपी आफताबला सप्टेंबरमध्ये चौकशीसाठी बोलावल्याचेही तपासात समोर आले आहे. तोपर्यंत आफताबने श्रद्धाचे डोकं आणि धड फ्रीजमध्ये ठेवले होते.
8 / 12
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपींना सोडून दिले. मुंबई पोलिसांनी आरोपींची कडक चौकशी केली असती तर दिल्ली पोलिसांना पुरावे गोळा करण्यासाठी भटकावे लागले नसते.
9 / 12
मुंबईहून आल्यानंतर आरोपींनी १८ ऑक्टोबर रोजी श्रद्धाचे डोकं आणि धड छतरपूरच्या जंगलात फेकून दिले होते. तेव्हाच त्याने हत्यारे फेकून दिली.
10 / 12
पोलिसांना श्रद्धाच्या बँक खात्याची माहितीही मिळाली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने १८ मे रोजी त्याच्या खात्यातून एकाच वेळी ५० हजार रुपये आणि दुसऱ्यांदा ४००० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले होते. यानंतर श्रद्धाच्या खात्यातून पैसे काढले गेले नाहीत. आफताब क्वचितच घरी ऑनलाइन जेवण ऑर्डर करायचा. तो फक्त बिस्किटे, स्नॅक्स आणि चिप्स ऑनलाइन ऑर्डर करत असे. मात्र, तो मित्रांसोबत बाहेर जेवायला जात असे.
11 / 12
श्रद्धाचे मित्र, तज्ज्ञ आणि वरिष्ठांनी दिल्ली पोलिसांना सांगितले की, आरोपी आफताब श्रद्धाला खूप मारहाण करायचा. दिल्ली पोलिसांनी मुंबईत जाऊन श्रद्धाच्या २० हून अधिक मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत. दिल्ली पोलिसांचे पथक अनेक दिवस मुंबईत होते. १५ दिवसांपूर्वी ही टीम मुंबईला गेली होती. आताही ही टीम मुंबईत आहे. आफताब आणि श्रद्धा मुंबईत राहत असलेल्या घरमालकाचेही जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.
12 / 12
पुढील आठवड्यापर्यंत डीएनए अहवाल अपेक्षित आहे. आतापर्यंत १३ हून अधिक हाडे सापडली आहेत. विशिष्ट हाडांचे प्रमाण व गुणवत्तेची जुळवाजुळव करून श्रद्धाच्या मृत्यूची खात्री केली जाईल. त्याने श्रद्धाची हत्या केली हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरDeathमृत्यूPoliceपोलिस