शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Walker Murder Case: आफताब पुरता अडकला; श्रद्धाच्या जंगलात सापडलेल्या हाडांनी भक्कम पुरावा दिला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 1:30 PM

1 / 7
श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या तपासात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मेहरौलीच्या जंगलातून पोलिसांना सापडलेल्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत जंगलात सापडलेली हाडं, केस आणि रक्त यांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला आहे. सीएफएसएलच्या अहवालात याची पुष्टी झाली आहे.
2 / 7
दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक करून चौकशी केली. यानंतर पोलिसांनी मेहरौली जंगल आणि गुरुग्राममध्ये त्याने नमूद केलेल्या ठिकाणाहून हाडांच्या रूपात मृतदेहाचे अनेक तुकडे जप्त केले होते. पोलिसांना मानवी जबड्याचे हाडही सापडले होते.
3 / 7
या सगळ्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सीएफएसएल लॅबला पाठवले होते. त्याचा आज अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून सापडलेल्या हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला आहे. त्यामुळे आतापर्यंतचा आफताबविरोधात मोठा पुरावा मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.
4 / 7
श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच हे तुकडे एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकण्यात आले होते. पोलीस आरोप आफताब पुनावालाची कसून चौकशी करत आहेत. आरोपी आफताब पूनावाला याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली.
5 / 7
दरम्यान, काही दिवसांपूर्वी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी माध्यमांशी संवाद साधत आफताबला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. आफताबने पूनावाला याने माझ्या मुलीची हत्या केली. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी, तसेच त्याच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विकास वालकर यांनी केली.
6 / 7
माझ्या मुलीसोबत जे झाले, असं कोणासोबतही होऊ नये, अशी माझी अपेक्षा असल्याचं विकास वालकर यांनी बोलावून दाखवलं. तसेच १८ वर्षांनंतर स्वातंत्र्य दिले जाते, यावर विचार व्हावा, अशी मागणी देखील विकास वालकर यांनी केली आहे. तसेच मी आता मोठी झाली आहे. त्यामुळे मी माझा निर्णय घेऊ शकते. मी आता काहीही करु शकते, असं श्रद्धा घर सोडताना म्हणाली होती. मात्र आजच्या युगाचा विचार करता, १८ वर्षांनंतरच्या स्वातंत्र्यावर बॅन आणण्याबाबत विचार करण्याची गरज असल्याची मागणी विकास वालकर यांनी केली आहे.
7 / 7
श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. कुणाला तिच्या हत्येचा संशय येऊ नये म्हणून तो श्रद्धाचे सोशल मीडिया अकाउंट वापरत राहिला. आफताबने श्रद्धाच्या खात्यातून ५४ हजार रुपयेही ट्रान्सफर केले होते. श्रद्धाचे मोबाइल लोकेशन आणि बँक खात्याच्या तपशीलाच्या मदतीने पोलीस आफताबपर्यंत पोहोचले. आफताबला पोलिसांनी १२ नोव्हेंबरला अटक केली होती.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरDeathमृत्यूPoliceपोलिस