शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Walker Murder Case: 'अगं कुठेयस?', श्रद्धासोबत ते शेवटचं बोलणं; मग आफताबलाही फोन केला, वडिलांनी सोडलं मौन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 1:55 PM

1 / 8
श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच हे तुकडे एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकण्यात आले होते. या प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत असून, दररोज नवनवीत खुलासे होताना दिसत आहेत. यातच पोलिस आरोप आफताब पुनावालाची कसून चौकशी करत आहेत. आरोपी आफताब पूनावाला याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली. मात्र, अद्यापही पोलिसांच्या हाती ठोस काही लागले नसल्याचे सांगितले जात आहे.
2 / 8
श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भेट घेतली. यावेळी भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील उपस्थित होते. या भेटीत तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती विकास वालकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच आफताबने पूनावाला याने माझ्या मुलीची हत्या केली. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी, तसेच त्याच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विकास वालकर यांनी केली.
3 / 8
दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलिसांचे काम व्यवस्थित सुरु आहे. वसई पोलिसांनी सहकर्य केले नाही. त्यांनी तक्रार दाखल झाल्यानंतर लगेच कारवाई केली असती, तर आज माझी मुलगी जिवंत असती. वसई येथील तुळीज पोलीस स्टेशन व मणिपूर पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला, असं विकास वालकर म्हणाले.
4 / 8
माझ्या मुलीसोबत जे झाले, असं कोणासोबतही होऊ नये, अशी माझी अपेक्षा असल्याचं विकास वालकर यांनी बोलावून दाखवलं. तसेच १८ वर्षांनंतर स्वातंत्र्य दिले जाते, यावर विचार व्हावा, अशी मागणी देखील विकास वालकर यांनी केली आहे.
5 / 8
विकास वालकर यांनी श्रद्धासोबतच्या झालेल्या शेवटच्या संवादाबाबतही माहिती दिली. २०२१मध्ये माझं आणि श्रद्धाचं फोनवरुन बोलणं झालं होतं. त्यावेळी मी तिला कुठे आहेस?, असं विचारलं होतं. यावर तिने ती सध्या बंगळुरुमध्ये असल्याचं मला सांगितलं, असं विकास वालकर म्हणाले.
6 / 8
तसेच २६ सप्टेंबर रोजी मी आफताबशी बोललो, तेव्हा मी त्याला माझ्या मुलीबद्दल विचारले, तेव्हा त्याने काहीच उत्तर दिले नाही, अशी माहितीही विकास वालकर यांनी दिली. तसेच श्रद्धासोबत होणाऱ्या हिंसाचाराबाबत आफताबच्या कुटुंबियांना देखील कल्पना होती, असा आरोप विकास वालकर यांनी केला.
7 / 8
श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचे शिर कुठे टाकून दिले, याचा शोध पोलीस घेत आहेत. यासंदर्भात एक तलावही रिकामा करण्यात आला. हरतऱ्हेने आफताबची चौकशी केली जात आहे. परंतु, पोलिसांना ठोस असे काहीच मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. नार्को टेस्टनंतर आफताबकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना असा कोणताही मोठा पुरावा मिळालेला नाही. जेणेकरून हे प्रकरण पुढे जाऊ शकेल. आफताबच्या चलाखीमुळे पोलिसांच्या हाती काही लागत नसून, पोलीस पुराव्यासाठी कठोर मेहनत घेताना दिसत आहेत. पोलिसांनी आफताबची आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये १० दिवस कसून चौकशी केली आहे.
8 / 8
या २३ दिवसांत पोलिसांची अनेक पथके तपासासाठी अनेक ठिकाणी गेली. पॉलिग्राफ चाचण्या झाल्या. एवढेच नाही तर दोन वेळा नार्को टेस्टही करण्यात आली. या सर्व प्रकारानंतरही पोलिसांचे हात कमी-अधिक प्रमाणात रिकामे असल्याचे म्हटले जात आहे. पहिली पॉलिग्राफ चाचणी अपेक्षित होती. प्रश्नांदरम्यान आफताबच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले गेले. यानंतर नार्को टेस्टमध्ये आफताब सर्वकाही कबूल करू शकेल, असा कयास बांधण्यात आला. पण आतापर्यंत नार्को टेस्टचे जे रिपोर्ट येत आहेत, ते पाहता हे प्रकरण तितकेसे सरळ नाही हे स्पष्ट होत असल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरPoliceपोलिसDeathमृत्यू