शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 3:25 PM

1 / 7
उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूरमध्ये एका वडिलांनी त्यांच्या मुलाचा मृतदेह १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवला आहे. त्यांच्या मुलाची हत्या झाल्याचा त्यांचा दावा आहे. या मृत मुलाच्या वडिलांनी न्यायासाठी सर्व अधिकाऱ्यांच्या दरवाजांचे उंबरठे झिजवले, मात्र न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचा मृतदेह १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवला आहे. तसेच आता न्यायालयात धाव घेतली आहे.
2 / 7
ही संपूर्ण घटना सुल्तानपूर जिल्ह्यातील कुडेभार ठाण्याच्या सरैया मझौवा गावातील आहे. शिवप्रसाद पाठक हे लष्करामध्ये सुभेदार होते. निवृत्त झाल्यावर ते गावी आले. शिवप्रसाद यांच्या कुटुंबामध्ये पत्नीसह दोन मुलगे शिवांक, इशांक आणि दोन मुली सुनिता आणि पूनम आहेत. वडिलांनी दोन्ही मुलींचे लग्न लावून दिले आहे.
3 / 7
त्यांचा मोठा मुला शिवांक हा दिल्लीमध्ये २०१२ मध्ये एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होता. यादरम्यान शिवांकने दिल्लीमध्ये २४ एप्रिल २०१२ रोजी एका व्यक्तीसोबत मिळून टॅक्सिगो नावाची कंपनी उघडली. कंपनीच्या पार्टनरने दिल्लीतील राहणाऱ्या गुरलिन कौर नावाच्या मुलीला एचआरच्या पदावर नियुक्त केले.
4 / 7
दरम्यान, शिवांकने याच मुलीसोबत २०१३ मध्ये विवाह केल्याचे सांगण्यात येत आहे. शिवांकच्या नावावर खूप संपत्ती होती. ज्यावर या तरुणीची नजर होती. यादरम्यान, १ ऑगस्ट २०२१ रोजी दिल्लीमध्ये शिवांकचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. दरम्यान, शिवांकचे वडील असल्याचे सांगत आहेत.
5 / 7
शिवांकचे वडील शिवप्रताप पाठक यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलग्याची हत्या झाल्याची तक्रार त्यांनी एसएचओ बेगमपुरा दिल्ली येथे दिली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. तसेच पोस्टमार्टेम झाल्यावर मृतदेह त्यांना दिला. त्यानंतर कुटुंबीय शिवांकचा मृतदेह घेऊन ३ ऑगस्ट रोजी गावी आले. तसेच मुलाच्या मृत्यूचे गुढ उकलण्यासाठी कुरेभार पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
6 / 7
शिवप्रताप यांचा आरोप आहे की, त्यांचे काही ऐकून घेण्यात आले नाही. त्यानंतर त्यांनी एक डीप फ्रिझर खरेदी केला. त्यात शिवांकचा मृतदेह ठेवून न्यायासाठी लढाई सुरू केली. ३ऑगस्टपासून ९ ऑगस्टपर्यंत ते स्थानिक पोलीस, एसपी आणि डीएमपर्यंत धाव घेत पोस्टमार्टम करण्याचे आणि गुन्हा दाखल करण्याची विनंती करत होते.
7 / 7
याबाबत सुल्तानपूर पोलीस अधीक्षक विपिन कुमार मिश्रा यांली सांगितले की, यामधील कुठलाही घटनाक्रम इथला नाही आहे. तसेच हे प्रकरण कोर्टामध्ये आहे. त्यामुळे याप्रकरणी मी कोर्टाच्या आदेशाची वाट पाहत आहे. कुठलाही आदेश आल्यानंतर मी कारवाई करेन.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत