बंद खोलीत असं काहीसं घडलं की जोडप्याने खाल्लं विष, गरोदर पत्नीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 14:55 IST
1 / 7पतीला चांगल्या उपचारासाठी भागलपूर येथे रेफर करण्यात आले आहे. या घटनेत जीव गमावलेल्या पत्नीच्या माहेरच्या लोकांनी पतीवर विष पाजल्याचा आरोप केला आहे.2 / 7 मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, जितेंद्रने दुसरे लग्न केले होते. या घटनेपूर्वी त्याने पहिल्या पत्नीला मारहाण करून पळ काढला होता. आत्महत्येची ही घटना मुंगेर जिल्ह्यातील हवेली खरगपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दरियापूरमधील असून तेथे या घटनेमुळे सोमवारी रात्री गोंधळ उडाला. 3 / 7दरियापूर येथील रहिवासी जितेंद्र रजक आणि त्यांची पत्नी प्रीती देवी यांनी परस्पर वादातून विष प्राशन केल्याचे गावकऱ्यांना समजले. त्यानंतर तात्काळ नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दोघांना उपचारासाठी घेऊन मुंगेर सदर रुग्णालयात दाखल केले.4 / 7या घटनेत प्रितीचा मृत्यू झाला, तर जितेंद्रला पुढच्या उपचारासाठी भागलपूरला रेफर करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र हा जेसीबी ड्रायव्हर होता आणि त्याचा प्रीतीशी एक वर्षापूर्वी खगरिया जिल्ह्यातील मधेपुरा येथे विवाह झाला होता.5 / 7जितेंद्रचे हे दुसरे लग्न होते, पण लग्नानंतर दोघेही कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडत असत. मंगळवारीही सकाळपासूनच दोघांमध्ये कशावरून तरी भांडण झाले आणि त्यानंतर रात्री दोघांनी विष प्राशन केले.6 / 7 प्रीतीची आई चुन्नी देवी यांनी सांगितले की, लग्नानंतर जितेंद्र नेहमी आपल्या मुलीला मारहाण करत असे आणि जितेंद्रने हे आपले दुसरे लग्न असल्याचे लपवून ठेवले होते. जितेंद्रने पहिल्या पत्नीलाही मारहाण करून तेथून पळ काढला होता.7 / 7सोमवारी सायंकाळी शेजाऱ्यांनी फोन करून जितेंद्र खोली बंद करून प्रितीला मारहाण करत असल्याचे सांगितले. रात्री जितेंद्रने स्वत: फोन करून सांगितले की, आपल्या मुलीने आणि त्याने विष प्राशन केले, त्यानंतर महिलेच्या माहेरची लोक मुंगेरला धावून गेले जेथे त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.