शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अरे देवा! प्रेमासाठी जावयासोबत पुण्याला पळून आली होती सासू, पुढे जे घडलं ते वाचून चक्रावून जाल....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 11:50 AM

1 / 10
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. या घटना इतक्या विचित्र असतात की, त्यांवर सहजासहजी विश्वास बसत नाही. अशीच एक घटना पुण्यातील बिबवेवाडीमधून समोर आली आहे. इथे एका जावयाने अनैतिक संबंधातून त्याच्या सासूची गळा दाबून हत्या (Son in law killed mother in law) केली.
2 / 10
धक्कादायक बाब म्हणजे या जावयासोबत सासू कर्नाटकातून पळून आली होती. मात्र, त्यांच्यात सतत वाद होत होते. यातूनच जावयाने हे कृत्य केलं. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली असून पुढील कार्यवाही केली जात आहे.
3 / 10
कर्नाटकातून जावयासोबत पळून आलेल्या ४५ वर्षीय मृत महिलेचं नाव अनारकली महमद तेरणे असं आहे. ती बेळगावची रहिवाशी आहे.
4 / 10
ती काही दिवसांपासून आपल्या २५ वर्षीय जावई आसिफ आतारसोबत बिबवेवाडी परिसरात राहत होती. या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा सुरू आहे. तर याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
5 / 10
झालं असं की, काही दिवसांपूर्वीच आसिफचं मृत महिलेच्या मुलीसोबत लग्न झालं होतं. नव्या जोडप्याचं सगळं काही आनंदात सुरू असताना जावई आणि सासू यांच्यात जवळीक वाढली.
6 / 10
सासूचं जावयावर प्रेम जडलं. हे प्रेम इतकं होतं की, सासू आणि जावयाने पळून जाण्याचा निर्णय घेतला. आपलं नातं पुढे सुरू ठेवण्यासाठी ना आरोपी आसिफने पत्नी विचार केला आणि सासूने स्वत:च्या मुलीचा विचार केला.
7 / 10
दोघेही बेळगावहून पळून पुण्यात आले. इथे बिबवेवाडी परिसरात ते राहू लागले. आसिफ मजुरीचं काम करत होता. बरेच दिवस दोघांमध्ये सगळं काही सुरळीत होतं.
8 / 10
मात्र काही दिवसातच वेगवेगळ्या कारणांनी दोघांमध्ये वाद होऊ लागले होते. दररोज त्यांचं भांडण होतं होतं. याला जावई आसिफ कंटाळला होता.
9 / 10
अखेर सततच्या भांडणांना कंटाळलेल्या जावयाने सासूची गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यावर तो फरार झाला. मात्र, पळून गेल्यावर आरोपी आसिफने एक चूक केली. त्याने पळून जाताना त्याच्या एका मित्राला सासूची हत्या केल्याचं सांगितलं.
10 / 10
आसिफच्या मित्राने हा प्रकार लगेच पोलिसांना सांगितला. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी लगेच कारवाई केली. कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी आसिफला पोलिसांनी अटक केली.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेKarnatakकर्नाटक