शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पतीच्या संशयास्पद मृत्यूवर काय बोलली होती सोनाली फोगाट? वाचा काय दिलं होतं तिने उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 12:17 PM

1 / 9
भाजपा नेता आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाटच्या मृत्यूनंतर आता पुन्हा एकदा तिचा पती संजय फोगाटच्या मृत्यूची चर्चा होऊ लागली आहे. संजय फोगाटचा मृत्यू 15 डिसेंबर 2016 मध्ये संशयास्पद स्थितीत त्याच्या गावात झाला होता. तेव्हा सांगण्यात आलं होतं की, त्याचा मृत्यू शेतात झाला होता आणि मृत्यूआधी त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. जेव्हा संजयचा मृत्यू झाला तेव्हा संजयची पत्नी म्हणजे सोनाली फोगाट हरयाणापासून दूर मुंबईत होती. त्यावेळी संजयच्या मृत्यूवरून अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते.
2 / 9
मात्र, परिवारानुसार त्याचा मृत्यू एक सामान्य पद्धतीने झाला होता आणि त्यावेळी पतीच्या मृत्यूवरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांना सोनाली फोगाट सडेतोड उत्तरही दिलं होतं. सोनाली म्हणाली होती की, तिचा एक मोठा परिवार आहे आणि तिच्या पतीचा मृत्यू एक सामान्य मृत्यू आहे. जर या मृत्यूवरून कुणी विनाकारण टीका करत असेल किंवा दिवंगत पतीबाबत कुणी अपमानकारक बोलत असेल तर ती त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करेल.
3 / 9
काही लोकांनी त्यावेळी सांगितलं होतं की, तिच्या पतीच्या मृत्यूमागे सोनालीचा हात होता. तेव्हा सोनाली म्हणाली होती की, जर तिने तिच्या पतीची हत्या केली असती किंवा तिच्या पतीने आत्महत्या केली असती तर ती तिच्या सासरी कशाला राहिली असती? सोनाली म्हणाली होती की, तिच्या पतीला आयुष्यात कोणतीही कमी नव्हती आणि ना त्याला काही समस्या होती. अशात ना त्याचा जीव घेतला गेला ना त्याने आत्महत्या केली.
4 / 9
सोनालीने सांगितलं होतं की, पतीचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या आजूबाजूला कमीत कमी 15 लोक होते. ज्यांनी तब्येत बिघडल्यावर त्याला सांभाळलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेले. सोनाली म्हणाली होती की, त्याच्या मृत्यूचं कारण हार्ट फेल होतं. ज्याला विनाकारण वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
5 / 9
हरयाणा्या फतेहाबादमध्ये राहणारी सोनाली फोगाटचा प्रवास अर्थातच संर्घषाचा होता आणि चढउताराचा होता. पण तिची कहाणी सिनेमाच्या एखाद्या कथेप्रमाणे आहे. तिला आधीपासूनच एक अभिनेत्री बनायचं होतं. तिने दूरदर्शनच्या एका हरयाणवी कार्यक्रमाच्या अॅंकरिंगपासून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. पण नशीब तिला राजकारणात घेऊन आलं. पण 42 व्या वयात अचानक तिचा मृत्यू झाला.
6 / 9
सोनाली सिंहचं लग्न हिसारच्या संजय फोगाटसोबत झालं होतं. पण लग्नाच्या काही वर्षातच म्हणजे 2016 मध्ये संजयचा मृतदेह संशयास्पद स्थितीत शेतात आढळून आला होता. पतीच्या मृत्यूवेळी सोनाली मुंबईत होती. सोनाली आणि संजयला एक मुलगी आहे. तिचं पालन पोषण एकट्या सोनालीने केलं. पण आता अचानक तिचा मृत्यू झाल्याने मुलगी एकटी झाली आहे.
7 / 9
सोनाली जेवढी सुंदर होती, तेवढेच सुंदर तिची स्वप्ने होती. तिला झगमगाट असलेली लाइफस्टाईल आवडत होती. त्यामुळेच तिचा अभिनयातच आपलं करिअर करायचं होतं. तिने आजतकच्या काही क्राइम शोमध्येही काम केलं होतं. ती अभिनयात आपलं कौशल्य वाढवत होती.
8 / 9
सोनाली 2008 मध्ये भाजपाची सदस्य झाली आणि पक्षात अॅक्टिव राहिली. पक्षाने तिला 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीची हिरारमधून तिकीट दिली. ती कुलदीप बिश्नोईच्या विरोधात उभी होती. पण तिला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दोघांची भेट झाली. त्यांनी मदभेद दूर करण्यासाठी ही भेट घेतली होती. ही भेट सोनालीच्या घरी झाली होती.
9 / 9
सोनालीचं वादांसोबत जुनं नातं राहिलं आहे. ती नेहमीच वादांमुळे चर्चेत राहत होती. सोशल मीडियावर जून 2020 मध्ये एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. व्हिडीओत सोनाली गल्ला मंडी भागात एका अधिकाऱ्याला चपलेने मारताना दिसली होती. यावरून खूप वाद झाला होता. तिच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.
टॅग्स :Sonali Phogatसोनाली फोगाटCrime Newsगुन्हेगारी