शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 3:46 PM

1 / 10
घरापासून सुमारे १०० मैल अंतरावर कारच्या डिक्कीत एक मृतदेह आढळला. अवघ्या दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या महिलेचा हा मृतदेह. वय अवघे २४ वर्षे आणि गळा दाबून निर्घृण हत्या केली होती. मृतदेहाची ओळख पटली असता मृत महिलेचे नाव हर्षिता ब्रेला असल्याचे समोर आले आहे.
2 / 10
घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका फुटेजमध्ये तिचा पती पंकज लांबा कारजवळ दिसत आहे, जो आता फरार आहे. सुमारे ६० गुप्तहेरांचे पथक त्याच्या शोधासाठी पाठवले आहे, परंतु खुन्याचा कोणताही सुगावा लागलेला नाही. १० नोव्हेंबर रोजी हर्षिताचा खून झाला आणि या घटनेला एक आठवडा उलटून गेला तरी हे प्रकरण सातत्याने गुंतागुंतीचे बनत आहे.
3 / 10
दिल्लीत राहणाऱ्या हर्षिताचं लग्न गेल्या वर्षी मार्च महिन्यात पंकज लांबासोबत झालं होतं. ऑगस्टमध्ये लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच हर्षिता तिच्या पतीसोबत यूकेमध्ये स्थायिक झाली. मात्र, काही काळाने पंकज आणि तिच्यात भांडण सुरू झाले. पंकज आमच्या मुलीवर अत्याचार करायचा. हर्षिताने सप्टेंबरमध्ये पंकजविरोधात तक्रारही केली होती असा हर्षिताच्या कुटुंबीयांचा आरोप आहे
4 / 10
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पंकज हर्षिताला बाहेर जाण्यापासून रोखत असे. एवढेच नाही तर पंकजने सोशल मीडियावर फोटो टाकण्यासही नकार दिला होता. अशा परिस्थितीत या भांडणाचं कारण काय आणि पोलिसांनी त्याला समुपदेशन का केले नाही, तक्रार आल्यानंतर पोलिसांनी हर्षिताला मदत का केली नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
5 / 10
हर्षिताच्या घराशेजारी राहणाऱ्या केली फिलिप नावाच्या महिलेने सांगितले की, घटनेच्या एक दिवस आधी मला भांडणाचे आवाज आले होते. हर्षिताच्या घरातून एक पुरुष आणि महिला यांच्यात जोरदार वादाचे आवाज येत होते. हाणामारी इतकी जोरात होती की त्यांच्या बेडरूमपर्यंत आवाज स्पष्ट ऐकू येत होते. दोघेही भारतीय भाषेत वाद घालत होते, त्यामुळे ते काय बोलत होते ते मला समजले नाही असं तिने म्हटलं.
6 / 10
तर पंकजने अनेकदा माझ्याकडे तक्रार केली की माझी मुलगी त्याचे ऐकत नाही. ती वेळेवर जेवण बनवत नाही आणि सतत तिच्या आईशी फोनवर बोलत राहते असं हर्षिताच्या वडिलांनी सांगितले. त्याशिवाय १० नोव्हेंबर रोजी माझं तिच्याशी बोलणे झाले होते. ती जेवण बनवत होती आणि पंकजची वाट पाहत होती असं हर्षिताच्या बहिणीने जबाब दिला. मग त्या रात्री पंकजने हर्षिताचा गळा आवळून तिचा जीव का घेतला असे काय घडले? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
7 / 10
हर्षिताचा मृतदेह घरापासून १६० किमी अंतरावरील पूर्व लंडनच्या इलफोर्ड भागात कारच्या डिक्कीत आढळून आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ११ नोव्हेंबरला पंकज ही गाडी ज्या ठिकाणी उभी होती तिथेही दिसत होता. अखेर, हत्येनंतर मृतदेह इतक्या दूर लपवून ठेवण्याचे कारण काय? हर्षिताचा मृतदेह लपवण्यासाठी पंकजने ही जागा का निवडली? याचाही शोध घेतला जात आहे.
8 / 10
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये १० नोव्हेंबर रोजी हर्षिताचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी एक दिवसापूर्वी शेजारच्या महिलेलाही भांडणाचा आवाज आला होता. अशा परिस्थितीत पंकजने घरातच खून केल्यानंतर मृतदेह इतक्या दूर नेऊन लपवला का, की गाडीतच गळा आवळून खून केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
9 / 10
हर्षिताला तिच्या वैवाहिक जीवनात घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत होता. सप्टेंबर महिन्यातच तिने कोर्टाकडून पंकजविरुद्ध घरगुती हिंसाचार संरक्षण आदेश मिळवला होता, जो २८ दिवसांसाठी वैध होता. या आदेशानुसार पंकज हर्षिताला त्रास देऊ शकत नाही किंवा तिच्याशी कोणत्याही प्रकारचा वादही करू शकत नाही. अशा स्थितीत प्रश्न असा पडतो की, हे प्रकरण एवढ्यापर्यंत वाढले असताना हर्षिता तिच्या आई-वडिलांकडे का परतली नाही? हेदेखील कोडं आहे.
10 / 10
हर्षिता ब्रेला हिच्या हत्येनंतर पंकज लांबा देश सोडून पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. लांबाचे ठिकाण शोधण्यासाठी पोलिस कॉर्बी आणि इल्फोर्ट भागात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करत आहेत. तो अखेरचा कॉर्बी आणि इलफोर्डमध्ये दिसला होता. या प्रकरणाशी संबंधित काही माहिती असल्यास त्यांनी त्वरित पोलिसांना कळवावे असं आवाहन पोलिसांनी केले आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी