शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महिला शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती ठेवले शरीरसंबंध, CCTV मध्ये रेकॉर्ड झाली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 1:24 PM

1 / 11
शिक्षकाला देवाचं रूप मानलं जातं. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षिका आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ज्यात विद्यार्थ्याचा आयुष्य उद्ध्वस्त झालंय.
2 / 11
इथे एका महिला शिक्षकाने शाळेतील १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
3 / 11
विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करण्याचा हा सिलसिल अनेक महिन्यांपासून सुरू होता. पोलिसांना तपासातून समजलं की, आरोपी शिक्षिकेने याआधीही अनेक विद्यार्थ्यांचं कथितपणे लैंगिक शोषण केलं आहे.
4 / 11
ऑस्ट्रेलिया (Australia) च्या सिडनी (Sydney) शहरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका २४ वर्षीय शिक्षिकेने १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलं.
5 / 11
या मुलाच्या लैंगिक शोषणाची घटना शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यानंतरच या घटनेचा खुलासा झाला.
6 / 11
मीडिया रिपोर्टनुसार, लंच ब्रेकआधी आरोपी मोनिकाने मुलाला तिचे काही अश्लील फोटो पाठवले होते. महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यालाही त्याचे काही आक्षेपार्ह फोटो मागितले होते.
7 / 11
दरम्यान आरोपी शिक्षिका मोनिका एलिजाबेथ आणखीही १० प्रकरणात आरोपी आहे. तिच्यावर १४ ते १६ वयोगटातील अनेक अल्पवयीन मुलांसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे.
8 / 11
गेल्यावर्षी १० जुलैला पोलिसांनी मोनिकाला अटक केली होती. आरोपी महिला मोनिकाला शिक्षा सुनावण्याआधी न्यायाधीशांनी कोर्टात मुलांचे जबाब वाचले.
9 / 11
त्यात लिहिलं होतं की, या शिक्षिकेमुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. त्याला शाळा सोडणं भाग पडलं. कारण इतर मुले त्याला चिडवत होते.
10 / 11
कोर्टाने मोनिका एलिजाबेथला दोषी ठरवत ४ वर्षे आणि ९ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. २ वर्षे ५ महिन्यांपर्यंत मोनिकाला पेरोल मिळणार नाही.
11 / 11
कोर्टाने मोनिका एलिजाबेथला दोषी ठरवत ४ वर्षे आणि ९ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. २ वर्षे ५ महिन्यांपर्यंत मोनिकाला पेरोल मिळणार नाही.
टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाSexual abuseलैंगिक शोषणTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी