शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंडरगारमेंट्समधून ड्रग्स घेऊन जात होती १९ वर्षीय डीलर, पोलिसांनी पकडलं तेव्हा झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 1:13 PM

1 / 9
ब्राझीलमध्ये एक तरूणी चांगलीच वादात सापडली आहे. केवळ १९ वर्षीय लॉरेनच्या अंडरगारमेंट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स आढळून आले आहेत.
2 / 9
पोलिसांनुसार, लॉरेनने तिच्या अंडरगारमेंट्समध्ये गांजा आणि कोकेन लपवले होते. लॉरेनच्या घरी धाड टाकल्यावर तिच्या घरात पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स सापडले आणि या प्रकरणी पोलिसांनी तिच्यासहीत तिच्या बॉयफ्रेन्डलाही अटक केली.
3 / 9
पोलीस म्हणाले की, लॉरेनवर संशय तेव्हा आला जेव्हा साओ पॉलो भागात ती एका टेंट बाहेर क्रॅक ड्रग्स विकण्यााचा प्रयत्न करत होती. पोलिसांनी जेव्हा लॉरेनची झडती घेतली तेव्हा तिच्या ब्रामध्ये गांजा आणि अंडरविअरमद्ये कोकेनची सहा पाकिटे सापडली. त्यासोबत १५ पॅकेट क्रॅक ड्रग्सचेही सापडले.
4 / 9
लॉरेनची वकिल एना पॉला सोरेसने स्थानिक मीडियासोबत बोलताना सांगितलं की तिला अजून तिच्या क्लाएंटला भेटण्याची संधी मिळाली नाही आणि ती लवकरच याबाबत स्टेटमेंट जारी करेल. लॉरेन आणि तिचा बॉयफ्रेन्ड सध्या तुरूंगात आहे.
5 / 9
तेच याप्रकरणी लॉरेनच्या मोठ्या भावाने हे मान्य केलं की, ती काही चुकीच्या लोकांच्या संगतीत आली आहे आणि आता तिला तिने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागेल.
6 / 9
लॉरेनचा भाऊ असंही म्हणाला की, लॉरेन एक चांगली व्यक्ती आहे. पण चुकीच्या लोकांच्या संपर्कात आली. सात वर्षाआधी त्यांच्या वडिलांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या बहिणीने क्राइम विश्वास पाउल ठेवण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या वडिलांच्या मृत्यूकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं आणि माझ्या बहिणीने वेगळ्या दृष्टीने पाहिलं.
7 / 9
तो पुढे म्हणाला की, पण हे बरोबर नाही. अशाने तिच्या चुकीला किंवा तिच्या अॅटिट्यूडला जस्टिफाय केलं जाईल. आम्ही तिला नेहमी समजावत होतो. पण ती काही गुन्हेगारांच्या प्रभावाखाली आली होती. तिने जे केलं ते चुकीचं आहे आणि तिला आता भोगावं लागेल.
8 / 9
दरम्यान पोलिसांना लॉरेन जिथे सापडली ते ठिकाण ब्राझीलमधील सर्वात जास्त ड्रग्स प्रभावित ठिकाण आहे. साओ पॉलोमध्ये ड्रग्सची तस्करी होत असल्याने या ठिकाणाला क्रॅक लॅंड असंही म्हटलं जातं. या ठिकाणी गुन्हेगारांचा मोठा दबदबा आहे. अनेकदा आपल्या ग्राहकांना प्रभावित करण्यासाठी येथील लोक त्यांना मोफतही ड्रग्स देतात.
9 / 9
लॉरेनची वकिल एना पॉला सोरेसने स्थानिक मीडियासोबत बोलताना सांगितलं की तिला अजून तिच्या क्लाएंटला भेटण्याची संधी मिळाली नाही आणि ती लवकरच याबाबत स्टेटमेंट जारी करेल. लॉरेन आणि तिचा बॉयफ्रेन्ड सध्या तुरूंगात आहे.
टॅग्स :Brazilब्राझीलDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी