शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुंबईत दररोज तीन महिलांवर बलात्कार, पोलिसांच्या अहवालातून झाला खुलासा

By पूनम अपराज | Published: July 25, 2022 5:04 PM

1 / 7
यावर्षी जानेवारी ते जूनपर्यंत महिलांवरील बलात्काराचे ४९४ गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या मासिक गुन्हे अहवालात ही बाब समोर आली आहे.
2 / 7
मुंबई पोलिसांच्या अहवालानुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात महिलांवर बलात्काराच्या ७३ घटना नोंदवण्यात आल्या आहेत.
3 / 7
मे महिन्यात हा आकडा 95 होता, ज्यामध्ये किरकोळ प्रकरणे 52 आणि मोठी प्रकरणे 43 आहेत.
4 / 7
गेल्या 61 दिवसांत 168 बलात्काराच्या घटना : जूनमध्ये दररोज २ महिलांवर बलात्कार झाले, तर मे महिन्यात दररोज 3 महिलांवर बलात्कार झाले. जून आणि मे महिन्यात म्हणजे गेल्या 61 दिवसांत 168 महिलांवर बलात्कार झाला. अशाप्रकारे या काळात मुंबईत सरासरी 3 महिलांवर बलात्कार झाले.
5 / 7
गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे : या वर्षी जानेवारी ते जूनपर्यंत म्हणजेच गेल्या 183 दिवसांत महिलांवरील बलात्काराचे 494 गुन्हे दाखल झाले आहेत.
6 / 7
दररोज सरासरी 2 ते 3 महिलांनी पोलिस ठाण्यात कोणावर तरी बलात्काराच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याच वेळी, 2021 मध्ये जानेवारी ते जून या कालावधीत बलात्काराचे 475 गुन्हे दाखल झाले आहेत.
7 / 7
८४% प्रकरणे निकाली काढली : बलात्काराच्या घटनांमध्ये तपासाचे प्रमाण पाहता काहीसा दिलासा मिळतो. जानेवारी ते जून या कालावधीत नोंदवलेल्या महिलांवरील बलात्काराच्या 84 टक्के गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केल्याचे अहवालात म्हटले आहे. हे यश 2021 च्या तुलनेत 19 टक्क्यांनी जास्त आहे, कारण गेल्या वर्षी पोलिसांनी केवळ 78 टक्के प्रकरणांची उकल केली होती.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळMumbaiमुंबई