शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वाढदिवशी गर्लफ्रेंडला मारहाण, अंगावर कुत्रा सोडल्यानं ३० टाके; प्रियकराचं अमानुष कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 3:41 PM

1 / 10
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण कितीही संकटं, कितीही आघात सहन करू शकतो, असं म्हटलं जातं. मात्र त्याच व्यक्तीनं आपल्यावर आघात केले, तर मग जबर मानसिक धक्का बसतो.
2 / 10
ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं, त्याच व्यक्तीनं मानसिक आणि शारीरिक यातना दिल्यावर माणूस खचून जातो.
3 / 10
ब्रिटनमधल्या ३१ वर्षीय लुसी जॅक्सन-स्टिफानेसे सोबत असाच काहीसा प्रकार घडला. टिंडरवर लुसीची भेट ३६ वर्षीय बेन रॉबर्ट्सनशी झाली. त्यांनी अवघ्या आठवड्यांमध्ये एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
4 / 10
इसेक्स भागात असलेल्या एका शाळेत शारीरिक शिक्षण आणि जलतरण शिक्षिका असलेली लुसी बेनच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र लवकरच बेन अतिशय विचित्र वागू लागला.
5 / 10
लुसीच्या वाढदिवशी बेन तिच्यासोबत भांडला. बेननं तिच्यावर कुत्रा सोडला. कुत्र्यानं केलेल्या हल्ल्यात लुसी जखमी झाली. तिच्या शरीरावर ३० टाके पडले.
6 / 10
लुसीसोबत राहू लागल्यानंतर तिसऱ्याच महिन्यात बेननं तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.
7 / 10
सुरुवातीला बेन लुसीला लहानसहान गोष्टींमध्ये रोखू लागला. तिच्या मेकअप करण्यावरही त्यानं आक्षेप घेतला.
8 / 10
हळूहळू बेन मानसिक त्रासासोबत शारीरिक त्रासदेखील देऊ लागला. त्यानं एकदा लुसीचे कपडे काढले आणि तिला बाल्कनीत ठेवून दरवाजा बंद करून घेतला.
9 / 10
लुसीच्या ३१ व्या वाढदिवशी दोघांमध्ये वाद झाला. लुसीनं तिच्या पालकांकडे जाण्याची तयारी सुरू केली. त्यावेळी बेननं तिच्या अंगावर कुत्रा सोडला. कुत्र्यानं घेतलेल्या चाव्यांमुळे लुसी जखमी झाली.
10 / 10
यानंतर लुसीनं क्लेर कायद्याचा आधार घेत बेनची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी तू आताच बेनला सोड अन्यथा तो तुला जीवंत सोडणार नाही, अशा शब्दांत एका पोलीस अधिकाऱ्यानं लुसीला पुढील धोक्याची जाणीव करुन दिली. लुसीनं बेनविरोधात कारवाई करण्याआधीच त्यानं आत्महत्या केली.