शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Raj Kundra Arrested: ‘पॉर्न फिल्म’च्या डीलमध्ये समोर आली ‘ही’ नावं; राज कुंद्राच्या अटकेनंतर मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 12:59 PM

1 / 13
उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) यांचे पती राज कुंद्रा(Raj Kundra) यांना मुंबई पोलिसांनी पॉर्न सिनेमा निर्मिती करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पॉर्न फिल्म बनवून अँपच्या माध्यमातून डाऊनलोड करण्याचा आरोप राज कुंद्रावर आहे.
2 / 13
मुंबई पोलिसांचा दावा आहे की, उद्योगपती राज कुंदा याच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. पोलिसांनी पॉर्न फिल्म अपलोड करणाऱ्या उमेश कामथलाही अटक केली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये गुन्हे शाखेने मुंबईत अश्लील फिल्म बनवणे आणि अँपच्या माध्यमातून ती पब्लिश करण्याचा गुन्हा दाखल केला होता.
3 / 13
मुंबई पोलिसांच्या या तपासात राज कुंद्रा हे नाव समोर आलं. त्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या एफआयआरनुसार राज कुंद्रा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ७ महिन्यात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
4 / 13
सोमवारी रात्री राज कुंद्रा याला अटक केल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात खळबळ माजली. रात्री उशिरा पोलिसांनी राज कुंद्राचं मेडिकल केले त्यानंतर आता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी २६ मार्च रोजी या प्रकरणात एकता कपूरचा जबाब नोंदवला होता.
5 / 13
महाराष्ट्र सायबर सेलने शर्लिन चोपडा आणि पूनम पांडे(Poonam Pandey) यांचाही जबाब नोंदवला आहे. राज कुंद्रा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. शर्लिन चोपडा हिच्या विधानानुसार तिला एडल्ट इंडस्ट्रीमध्ये आणण्यात राज कुंद्राच आहे.
6 / 13
प्रत्येक प्रोजेक्टसाठी शर्लिन चोपडा(Sherlyn Chopra) हिला ३० लाख रुपये पेमेंट मिळत होते. शर्लिनने दिलेल्या जबाबानुसार, तिने १५-२० प्रोजेक्ट तयार केले आहेत. आता सिनेमा अपलोड कुठून आणि कोण करतं याबाबत पोलिसांना नवीन माहिती मिळाली आहे.
7 / 13
पोलिसांच्या माहितीनुसार, फक्त देशातून नव्हे तर परदेशातूनही अपलोड केली जातात. राज कुंद्रा याचा निकटवर्तीय हा फिल्म अपलोड करतो. तपासानुसार सॉफ्ट पॉर्नोग्राफी लंडनहून अपलोड करण्यात येत होत्या. हे काम उमेश कामथ नावाचा व्यक्ती करत होता.
8 / 13
उमेश कामथ हा नवीन अभिनेता आणि अभिनेत्री यांचे सिनेमेही एप्लिकेशनवर अपलोड करत होता. आतापर्यंत ९० हून अधिक पॉर्न व्हिडीओ शूट करण्यात आले आहेत आणि सर्व अपलोड करण्यात आले आहेत. ज्यावेळी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठला ताब्यात घेतलं तेव्हा याचा खुलासा झाला.
9 / 13
गहना वशिष्ठ हिला अटक केल्यानंतर या प्रकरणात विविध खुलासे झाले. मुंबईतील मालाड वेस्ट इथं एका बंगला भाड्याने घेतला जात होता. याच ठिकाणी पॉर्न फिल्मचं शुटींग केले जात होते. पोलिसांनी ज्यावेळी इथं छापा टाकला तेव्हा अश्लिल फिल्मचं शुटींग सुरू होतं.
10 / 13
१९ जुलै गुन्हे शाखेने राज कुंद्राला अटक केली. रात्री ९ पासून मध्यरात्री २ पर्यंत चौकशी सुरू होती. सकाळी ४ वाजता राज कुंद्राला मेडिकलसाठी जे जे हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आले. मेडिकलनंतर राज कुंद्राला मुंबई पोलिस आयुक्तांकडे नेण्यात आले.
11 / 13
राज कुंद्रा आणि प्रदीप बख्शीमध्ये व्यावसायिक भागीदारी, प्रदीप बख्शी हा कॅनरिन प्रोडक्शन हाऊस नावाची कंपनी चालवतो. राज कुंद्रा कॅनरिन प्रोडक्शन हाऊसमध्ये बिझनेस पार्टनर आहे. राज कुंद्राच याचा मालक असल्याचं बोललं जातं.
12 / 13
भारतात या कंपनीचा प्रतिनिधी राज कुंद्राचा पीए उमेश कामथ होता. कंपनीच्या माध्यमातून अश्लिल सिनेमांना फंडिंग केले जायचे. गहना वशिष्ठला कॅनरिनच्या माध्यमातून अश्लिल सिनेमात काम मिळत होते. मेल आयडीद्वारे फिल्म पाठवल्या जात होत्या.
13 / 13
पॉर्न फिल्म बघणाऱ्यांकडून थेट अकाऊंटमध्ये पैसे घेतले जात होते. कॅनरिन अश्लिल सिनेमे OTT प्लॅटफॉर्मवर अपलोड करत होती. राज कुंद्राच्या अटकेनंतर आतापर्यंत या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलीस आणखी याचा तपास करत आहे.
टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राShilpa Shettyशिल्पा शेट्टीMumbai policeमुंबई पोलीस