शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धक्कादायक! ऑपरेशन दरम्यान महिलेच्या पोटातच सोडला टॉवेल, तीन महिन्यांपर्यंत सुरू राहिले उपचार....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 9:54 AM

1 / 9
उत्तर प्रदेशच्या देवरियातील एका खाजगी हॉस्पिटलमधील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोप आहे की, एका गर्भवती महिलेच्या सिजेरियन ऑपरेशन दरम्यान तिच्या पोटातच टॉवेल सोडला आणि टाके लावले गेले.
2 / 9
इतकेच नाही तर तीन महिन्यांपर्यंत तिच्यावर उपचारही सुरू होते. ती बरी झाली नाही तर तिला हरनिया असल्याचं सांगत दुसरीकडे रेफर केलं.
3 / 9
देवरियाच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. इथे गर्भवती महिलेवर उपचार सुरू होते. ऑगस्ट महिन्यात तिची डिलीवरी होणार होती. ती माहेरी गौरीबाजारला गेली आणि १२ ऑगस्टला एका हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. ऑपरेशननंतर महिलेने बाळाला जन्म दिला.
4 / 9
महिलेने सांगितले की, ऑपरेशननंतर तिच्या पोटात जोरात वेदना होत होत्या. तिला उलट्याही होत होत्या. एनीमिया आजार सांगून डॉक्टर तिच्यावर नोव्हेंबरपर्यंत उपचार करत राहिले. नंतर हर्निया सांगत तिला गोरखपूर रेफर करण्यात आलं.
5 / 9
गोरखपूरमध्येही तिला आराम मिळाला नाही तर तिच्यावर लखनौमध्ये उपचार सुरू झाले. पण तिच्या पोटाचं दुखणं काही थांबलं नाही. यादरम्यान ती गावी परतली तेव्हा एकाने सल्ला दिला की, गोरखपूरमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखवा.
6 / 9
२९ जानेवारीला ती हॉस्पिटमध्ये भरती झाली आणि २ फेब्रुवारीला तिच्या पोटाचं मोठं ऑपरेशन करण्यात आलं. तेव्हा त्यांना जे दिसलं पाहून डॉक्टर हैराण झाले.
7 / 9
ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून टॉवेल काढण्यात आला. आत टॉवेल असल्याने पोटात इन्फेक्शन झालं होतं. गर्भाशय पूर्णपणे सडलं होतं. त्यामुळे ते काढावं लागलं. सध्या महिलेची स्थिती गंभीर आहे.
8 / 9
तिचा पती म्हणाला की, तो एक मजूर आहे. त्याला तीन लहान लेकरं आहेत. आणि सध्या तो नातेवाईकांकडे राहत आहे. उपचार करत असताना त्याचं शेतही विकावं लागलं. दागिने गहाण ठेवले आहेत. याप्रकरणी सीएमओ आलोक पांडे यांनी एक चौकशी समिती नेमली आहे.
9 / 9
आलोक पांडे यांनी सांगितले की, त्या हॉस्पिटलबाबत माझ्याकडे माहिती आली आहे. माहिती ही आहे की, ऑपरेशन दरम्यान तिथे महिलेच्या पोटात टॉवेल तसाच सोडला. लवकरच चौकशी करून रिपोर्ट दिला जाईल. त्यानंतर हॉस्पिटलवर योग्य ती कारवाई केली जाईल.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीpregnant womanगर्भवती महिला