शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खजिन्यासाठी लावलेली पैज जीवावर बेतली, दोन जणांचा मृत्यू

By पूनम अपराज | Published: September 21, 2020 9:05 PM

1 / 8
जेव्हा खड्डा खणला गेला, तेव्हा पैज लावलेले पैसे न देण्यासाठी म्हणून तिघांना जलेबी आणि प्रसादमध्ये विष मिसळून देण्यात आले, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. ही आश्चर्यकारक घटना मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील आहे. (All Photo - Aaj tak)
2 / 8
भिंडच्या मौ पोलीस ठाण्याच्या खजिना प्रकरणात दोघांच्या मृत्यूचे गूढ सोडवताण भिंड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा देखील दाखल केला आहे.
3 / 8
मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी मौ पोलीस स्टेशनला मदनपुरा गावाजवळ शेतात खजिना शोधण्याच्या प्रयत्नात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. मौ पोलिस स्टेशन परिसरातील मदनपुरा गावाजवळ शेतात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता तर दुसर्‍या व्यक्तीचा मृतदेह गोहद पोलीस स्टेशन परिसरात सापडला होता. होतम सिंह और उमेश सिंह अशी मृतांची नावे आहेत तर लक्ष्मण सिंह नावाचा आणखी एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडला होता.
4 / 8
लक्ष्मण सिंगला शुद्ध आल्यानंतर त्याने पोलिसांना सांगितले की, तो हा खजिना शोधण्यासाठी गेला होता, परंतु अचानक प्रकृती बिघडली आणि होतमचा जीव गेला, त्यानंतर लक्ष्मण स्वत: बेशुद्ध झाला. त्याला उमेशच्या मृत्यूची माहिती नव्हती, पण खजिना खणण्यापूर्वी त्याच्याबरोबर आणखी तीन माणसे होती, ज्यांनी प्रार्थना केली होती आणि लाडू व जलेबी खायला दिली होती, असेही त्याने सांगितले.
5 / 8
पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता अन्य तीन खजिना शोधण्यासाठी होतम, उमेश आणि लक्ष्मण यांच्यासह कोण गेलेला आहे, याचा शोध लागला. पोलिसांनी रामदास गुर्जर, थानसिंग कुशवाह आणि खलीफासिंग कुशवाह यांना अटक केली.
6 / 8
चौकशीदरम्यान तिघांनी सांगितले की, खड्डा खोदण्यापूर्वी होतम आणि उमेशचा खलीफा कुशवाह याच्यासोबत पैज लावली होती की जर होतम आणि लक्ष्मणने खजिना मिळवण्यासाठी खड्डा खोदला तर खलीफा त्याला 10,000 रुपये देईल. जर आपण खजिना मिळवण्यासाठी खड्डा खोदू शकलो नाही तर खलिफाला 10 हजार रुपये द्यावे लागणार होते. 
7 / 8
पैज लावल्यानंतर होतम आणि लक्ष्मण यांनी तिजोरीखजिना मिळवण्यासाठी ५ फूट खोल खड्डा खणला. पैज लावून आता 10,000 रुपये द्यावे लागतील असे जेव्हा खलिफाला वाटले तेव्हा तो आपल्या साथीदारांसह प्रसाद घेण्यासाठी गेला आणि वाटेत प्रसादात विषारी पदार्थ घातला.
8 / 8
जेव्हा तो खड्ड्याच्या ठिकाणी पोहोचला, त्याने तेथे प्रथम पूजा केली. यानंतर लक्ष्मण, उमेश आणि होतम यांना प्रसाद म्हणून लाडू व जलेबी खायला दिली गेली त्यानंतर तिघांची प्रकृती खालावली. होतमचा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मणने कमी लाडू व जलेबी खाल्ल्यामुळे तो केवळ बेशुद्ध झाला. उमेश तिथून निघून गेला आणि काही अंतर गेल्यावर उमेशही मरण पावला. याप्रकरणी पोलिसांनी खलिफा कुशवाह, थान सिंग कुशवाह आणि रामदास गुर्जर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली.
टॅग्स :MurderखूनMadhya Pradeshमध्य प्रदेश