शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha walker Case: श्रद्धा, आफताब अन् दृश्यम: पॉलिग्राफ चाचणीत मोठे कनेक्शन; शिंका अन् उत्तरांनी पोलीस चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 7:07 PM

1 / 8
दृश्यम सिनेमा आणि त्यातील खुनाचे रहस्य आदीची चर्चा काही वर्षांपूर्वी होती. आता त्याचा दुसरा पार्ट आला आहे. श्रद्धा मर्डर केसशी याचा काय संबंध? या सिनेमात सारे काही प्लॅन केले गेले, समोर सारेच होते पण पोलिसांना ते दिसत नव्हते. नेमका हाच गेम आफताब दिल्ली पोलिसांसोबत खेळत आहे. यामुळे त्याच्या उत्तरांनी पोलीसही हैराण झाले आहेत.
2 / 8
FSL डॉयरेक्टर दीपा वर्मा यांच्या नेतृत्वात आफताबची पॉलिग्राफ टेस्ट होत आहे. पोलिसांनुसार या चाचणीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. श्रद्धाच्या हत्येपूर्वी त्याने 'दृश्यम' हा बॉलिवूड चित्रपट पाहिला होता, तो पार्ट-2 चीही वाट पाहत होता.
3 / 8
दृश्यम पाहूनच आफताब श्रद्धाच्या हत्येची कथा रचण्याचा प्रयत्न करत होता. आफताबने प्लॅनिंग करून खून केला आणि नंतर श्रद्धाचे मित्र आणि कुटुंबीयांशी बोलून तो असे पुरावे तयार करत राहिला, ज्यामुळे नंतर त्याचे निर्दोषत्व सिद्ध करणे सोपे गेले असते, असे सुत्रांनी सांगितले.
4 / 8
पॉलीग्राफ चाचणीच्या पहिल्या दिवशी आफताबने एफएसएल तज्ज्ञासमोर दृश्यम या चित्रपटाचा उल्लेख केला. यावर त्याला तू तो पाहिलास का असे विचारण्यात आले. यावर त्याने हो पाहिला, आता तर दृश्यम २ देखील आला आहे, असे उत्तर दिले. यावर आफताबला चित्रपट पाहून तू वाचू शकशील का असे तज्ज्ञांनी विचारले असता त्याने काहीच उत्तर दिले नाही.
5 / 8
दृश्यम सिनेमा पाहिल्यानंतर तू श्रद्धाला मारण्याचा कट रचलास का, असे विचारताच त्याने हो असे उत्तर दिले. श्रद्धावर प्रेम नाही तिचा तिरस्कार करत असल्याचे टेस्टमध्ये सहभागी असलेल्या मनोवैज्ञानिकांना वाटत आहे.
6 / 8
एफएसएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या पॉलीग्राफी चाचणीदरम्यान आफताबला सर्दी आणि ताप आला होता. तो वारंवार शिंकत होता, ज्यामुळे रेकॉर्डिंगमधील अनेक प्रश्नांची त्याची उत्तरे अस्पष्ट नोंदिविली गेली होती. पोलीस आणि एफएसएल टीम हिंदीत प्रश्न विचारत असून आफताब मुद्दाम इंग्रजीत उत्तर देत होता. हे प्रश्न आज पुन्हा विचारले जाणार आहेत.
7 / 8
आफताबची देहबोली त्याने काहीच केलेले नाही असे दाखवत आहे. पोलिसांसमोर थोडासा अस्वस्थ किंवा घाबरलेला आहे, असे कुठेही दिसत नाही. यामुळे त्याला आणखी बळ मिळत आहे. देहबोली अगदी सामान्य ठेवत असल्याने पोलिसही चक्रावले आहेत.
8 / 8
श्रद्धाला का मारले? श्रद्धाला कोणत्या शस्त्राने मारले? -शरीर हाताने कापले की की अन्य मार्गाने? - श्रद्धाला तोडताना अजिबात दया आली नाही का? श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले होते? श्रद्धाला मारल्यानंतर काय केले? खुनाचे हत्यार कुठे आहे? दिल्लीला मारण्याच्या प्लॅनमध्ये श्रद्धाला आणले होते? श्रद्धाला मारल्याचा पश्चाताप होतोय का?
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरDrishyam 2दृश्यम 2