शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

व्हॉट्सअ‍ॅप हॅक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, नायजेरियात बसून भारतात 'अशा' सुरू होत्या कारवाया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 5:20 PM

1 / 9
नवी दिल्लीतील टिळक मार्ग पोलीस पोलीस ठाणे आणि स्पेशल स्टाफ फोर्सच्या पथकानं एका अशा गँगचा पर्दाफाश केला आहे की जी गँग व्हॉट्सअ‍ॅप हॅक करुन लोकांना लाखोंचा गंडा घालत होती. पोलिसांनी एका नायजेरियन नागरिक ज्याचं नाव okwudiri paschal असं असून बंगलोरमधून त्याला अटक करण्यात आली आहे.
2 / 9
नवी दिल्लीचे डीसीपी दीपक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडे २ नोव्हेंबर रोजी रंगलाल नावाच्या एका व्यक्तीनं फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यांना एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला होता आणि त्यात तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करा असा संदेश देण्यात आला होता. त्यानंतर मोबाइल नंबरची नोंद करुन मेसेजवर प्राप्त झालेला ६ अंकी ओटीपी भरण्यास सांगण्यात आलं होतं.
3 / 9
तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार जसं त्यानं ६ अंकी ओटीपी भरला त्याच क्षणी मोबाइलची स्क्रीन लॉक झाली आणि मोबाइल हॅक झाला. त्यानंतर ज्या व्यक्तीनं व्हॉट्सअ‍ॅप हॅक केलं त्या व्यक्तीकडून मोबाइलमधील इतर कॉन्टॅट्सवर कॉल करुन पैसे मागण्यास सुरूवात केली आणि स्वत:च्या बँक अकाऊंटची माहिती देखील शेअर केली.
4 / 9
टिळक नगर पोलिसांनी याची तक्रार दाखल करुन घेत तपासाला सुरुवात केली. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांचं एक पथक बंगलोरला रवाना झालं. हॅकर आपलं बँक अकाऊंटवर वारंवार बदलत होता आणि जसं त्याच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाल्या झाल्या तो ते काढून बँक अकाऊंट कायमस्वरुपी बंद करत होता.
5 / 9
१६ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी ट्रॅप लावला आणि बंगलोरमधील एका एटीएममधून संशयित नायजेरियन व्यक्ती पैसे काढून बाहेर आला. तसंच पोलिसांना त्याला रंगेहाथ पकडलं. आरोपीनं पोलिसांना धक्का मारुन पळण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांचा संशय खरा ठरला.
6 / 9
पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाइलनं त्याचा माग काढत त्याला अटक केली. आरोपीनं ज्या व्यक्तीचा मोबाइल हॅक केला होता. त्यातील एका कॉन्टॅक्टकडून २० हजार रुपयांची मागणी केली होती. तेच २० हजार रुपये काढण्यासाठी तो एटीएममध्ये आला होता.
7 / 9
पोलिसांनी आरोपीकडून एकूण ७ एटीएम कार्ड्स, अनेक सिम कार्ड आणि चार मोबाइल फोन जप्त केले आहेत. आरोपीच्या चौकशीत मोडस ऑपरेंडी समोर आली आणि ही आंतरराष्ट्रीय टोळी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड गँग अस्तित्वात असून याची सुत्रं थेट नायजेरियातून चालत असल्याची माहिती समोर आली आहे.
8 / 9
नायजेरियातून भारतीय व्यक्तींचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करण्याचं काम केलं जातं आणि हॅकर्सचे हँडलर्स भारतात विविध ठिकाणी पसरलेले आहेत. हेच हँडलर्स संबंधित व्यक्तीकडून पैसे उकळण्याचं काम करतात.
9 / 9
व्हॉट्सअ‍ॅपवर अशा पद्धतीचा कोणताही अपडेट करण्याचा मेसेज आला तर त्यावर क्लिक करु नये आणि मोबाइल नंबरची मागणी केली गेल्यास तो अजिबात देऊ नये, असं आवाहन दिल्ली पोलिसांनी केलं आहे. एकदा का तुमचं व्हॉट्सअॅप हॅक झालं की फोन हॅक होण्यास फारवेळ लागत नाही. त्यानंतर तुमचं पेटीएम, गुगल प्ले सारंकाही हॅक केलं जातं आणि ते सुरक्षित ठेवण्याची धमकी देऊन पैसे उकळण्यासाठी तुमच्या कॉन्टॅक्ट लीस्टचा वापर केला जातो. दरम्यान, पोलिसांनी आता नाजेरियातील टोळीपर्यंत पोहोचण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू केली आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप