शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Google Map च्या नादात महिलेचा जीव आला धोक्यात; तुम्हीही करताय का अशी चूक?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 3:20 PM

1 / 10
आजकालच्या इंटरनेट जगात प्रत्येक गोष्टी सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. इंटरनेटनं अवघ्या जगाला एकत्र आणलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी काम बरीच सहज आणि सुलभ केली आहेत. त्यामुळे अनेकजण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जीवन जगत असतात.
2 / 10
Google Map हे असं तंत्रज्ञान आहे. ज्यामुळे सॅटेलाईटच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाणं सोप्प होतं. रस्ते माहिती नसल्याने गुगल मॅपचा वापर सर्रासपणे सगळेच करत असतात. काहीवेळा हे तंत्रज्ञान माणसांसाठी सोयीस्कर ठरते. परंतु हे वापरताना काळजी घेणंही गरजेचे आहे.
3 / 10
मॅड्रीडमध्ये घडलेल्या एका घटनेने सगळेच हैराण झाले आहेत. याठिकाणी Google Map चा वापर करणं महिलेच्या जीवावर बेतलं होतं. काही दिवसांपूर्वीच ही महिला स्पेनला पोहचली होती. बाजारात शॉपिंग करत असताना तिने घरी परतण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला.
4 / 10
गुगल मॅपद्वारे तिला घरी जाण्यासाठी शॉर्टकट सापडला. गुगल दाखवेल त्या रस्त्याने महिला पुढे जात राहिली. पण त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं. ही महिला अशा ठिकाणी पोहचली होती जिथं चोरी, गुन्हेगारी घटना जास्त होतात. त्यासाठी ते कुख्यात आहे.
5 / 10
यापूर्वी महिलेला काही कळतं तितक्याच एका गुन्हेगारानं तिला पकडलं आणि तिला बेदम मारहाण केली. मिरर रिपोर्टनुसार, महिलेने तिच्यासोबत घडलेला किस्सा सोशल मीडिया साईटवर शेअर केला आहे. या पीडितेने सांगितले. काही दिवसांपूर्वीच मी स्पेनला शिफ्ट झाली आहे.
6 / 10
बाजारात खरेदी करत असताना मी इतक्या दूर आले की मला पुन्हा घरी जाण्याचा रस्ताच सापडला नाही. मी खूप गोंधळलेल्या अवस्थेत होते. त्यासाठी मी गुगल मॅपचा आधार घेतला. मॅपनं ज्या रुटचा मार्ग दाखवला. मी तो रुट फॉलो करत निर्जन स्थळी पोहचली जिथं लुटीच्या अनेक घटना घडतात.
7 / 10
या स्थळाचं नाव होतं EI Vacie. मी जसं त्याठिकाणी पोहचले तसं एक व्यक्ती माझ्याकडे धावत आला आणि त्याने माझी पर्स हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी त्याला विरोध केला तेव्हा त्याने माझ्या अंगावर बुक्क्या मारायला सुरुवात केली.
8 / 10
त्यानंतर मी मारहाणीत बेशुद्ध पडले. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होती. तो माझी पर्स घेऊन पसार झाला होता. हॉस्पिटल स्टाफने मला सांगितलं त्या परिसरात जाण्याची गरज काय होती? तो भाग गुन्हेगारीसाठी खूप कुप्रसिद्ध आहे.
9 / 10
महिलेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर तिने दुसऱ्या दिवशी घडलेल्या घटनेची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहचली तेव्हा अधिकाऱ्यांनी तुम्हाला त्या भागात जाण्याचं कारण काय होतं? अशी विचारणा केली. तो भाग गुन्हेगारी कृत्यांसाठी ओळखला जातो.
10 / 10
भविष्यात कधीही एकटं असताना त्या भागात जाण्याचा विचार करु नका असं पोलिसांनी सांगितले. पीडित महिलेने सांगितले की जर मी टेक्नॉलॉजीवर जास्त विश्वास ठेवला नसता तर कदाचित माझ्यासोबत हा जो काही प्रकार घडला आहे टळला असता. भविष्यात मी खूप विचार करेन.
टॅग्स :googleगुगल