शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:17 PM

1 / 10
३ महिन्याच्या एका गुप्त मोहिमेनंतर गँगस्टर रवी काना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या घातल्या. त्याच्यासोबत त्याची प्रेयसी काजल झा हीदेखील पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करत होती. तिलाही अटक करण्यात आली आहे.
2 / 10
हे दोघं थायलँडमध्ये लपले होते, शुक्रवारी रात्री त्यांनी दिल्ली एअरपोर्टला पकडलं. काजल झा ही ८ वर्षापूर्वी रवी कानाच्या संपर्कात आली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर काजल कोट्यवधी संपत्तीची मालकिण बनली. तिची ही कहाणी कशी आहे जाणून घेऊ
3 / 10
८ वर्षापूर्वी बिहारमध्ये राहणारी काजल झा नोकरीच्या शोधात होती. अनेक ठिकाणी फिरल्यानंतर तिची भेट भंगार व्यावसायिक रवींद्र नागर उर्फ रवी कानाशी झाली. काजलचे वडील त्याच्या कंपनीत कामगार होते. रवी कानाने काजलला त्याच्याच कंपनीत हिशोब ठेवण्याचं काम दिले. काजलनं हे काम प्रामाणिकपणे केले आणि रवी कानाचा तिच्यावर विश्वास बसला.
4 / 10
हळूहळू काजल आणि रवी काना यांच्यात जवळीक वाढली, रवी काना कुठलेही काम करताना काजलचा सल्ला घ्यायचा. काजलच्या हजरजबाबीपणामुळे रवी काना खुश झाला. काजल त्याच्या गँगची प्रमुख भाग बनली. रवी कानाने काजलच्या नावानं दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत एक बंगला खरेदी केला. ज्याची किंमत १०० कोटी रुपये होती.
5 / 10
रवी कानाच्या संपर्कात येऊन काजलचं आयुष्य बदलायला सुरू झाले. सर्वसामान्य नोकरी करणारी काजल आता कोट्याधीश झाली होती. तिला लग्झरी लाईफ जगण्याची सवय झाली. ब्रँण्डेड कपडे, चष्मे, बुटे ही काजलची आवड होती. रवी कानाला कधीही भेटण्याची मुभा काजलला होती.
6 / 10
परंतु हे सर्व जास्त काळ चाललं नाही. काजलच्या आयुष्यात नवीन वळण आलं होते. जेव्हा सर्व सोडून तिला रवी कानासोबत थाडलँडला पळून जावं लागलं. डिसेंबर २०२३ मध्ये एका महिलेने ग्रेटर नोएडातील सेक्टर ३९ पोलिस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराची तक्रार केली होती.
7 / 10
भंगार माफिया रवी काना आणि त्याच्या चार साथीदारांवर या सामूहिक बलात्काराचा आरोप होता. नोएडातील एका प्रसिद्ध मॉलच्या पार्किंगमध्ये सामूहिक बलात्कार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रवी कानाच्या आवारात छापा टाकला. एफआयआरमध्ये नाव असलेल्या त्याच्या तीन साथीदारांना पकडण्यात आले, मात्र तो एका साथीदारासह रवी फरार झाला.
8 / 10
रवी कानाच्या शोधात पोलीस त्याची प्रेयसी काजल झा हिच्या न्यू फ्रेंड्स कॉलनीतील बंगल्यावर पोहोचले. पण, इथे रवी काना किंवा काजल झा दोघेही दिसले नाहीत. यानंतर पोलिसांनी हा बंगला सील केला. नंतर रवी काना आणि काजल झा थायलँडमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
9 / 10
आता थायलँड पोलिसांनी या दोघांना शुक्रवारी भारतात डिपोर्ट केले. त्यानंतर दिल्ली एअरपोर्टवर इथल्या पोलिसांनी या दोघांना अटक केली. थायलँड पोलिसांनी रवी काना आणि काजल झा यांना बँकॉकला अटक केली होती.
10 / 10
शनिवारी दिल्ली पोलिसांनी या दोघांनाही कोर्टासमोर हजर केले. तेव्हा त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. काजल झा हिचं नोएडा येथील एका कॉलेजमध्ये बीकॉमचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे रवी कानाच्या कंपनीत ती अकाऊंट म्हणून हिशोब सांभाळत होती.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस