शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पत्नी आणि मुलीवर फावड्याने हल्ला, कुत्रा भुंकत होता, तरीही...; पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2022 2:38 PM

1 / 9
गाजियाबाद येथील सिहानी गावात शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास रेखा पाल आणि ताशू या दोघींची हत्या झाल्याचं समोर आले. या हत्येचा आरोपी पती संजय पाल असून तो रिक्षाचालक आहे. दुपारी १ वाजता पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. रेखाचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून पतीने हे कृत्य केले. गाजियाबाद येथील सिहानी गावात शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास रेखा पाल आणि ताशू या दोघींची हत्या झाल्याचं समोर आले. या हत्येचा आरोपी पती संजय पाल असून तो रिक्षाचालक आहे. दुपारी १ वाजता पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. रेखाचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून पतीने हे कृत्य केले.
2 / 9
आरोपीनं पोटच्या मुलीलाही सोडलं नाही. १४ वर्षीय ताशू रेखाची साथ देत असल्याने तिलाही संपवण्यात आले. आधी फावड्याने रेखाच्या गळ्यावर वार केले आणि नंतर उशीने तोंड दाबलं. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर झोपलेल्या मुलीलाही मारून टाकलं. त्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून तिथून पळ काढला.
3 / 9
पोलिसांनी सांगितले की, जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या सिहानी गावात राहणाऱ्या संजय पाल याने पत्नी आणि मुलीची हत्या केली आहे अशी दुपारी १२ च्या सुमारास एका युवकाने फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवून ताब्यात घेतले. माहिती देणारा तरुण हा संजय पालचा ओळखीचा होता.
4 / 9
युवकाच्या सहाय्याने पोलिसांनी संजयला पकडलं आणि पोलीस स्टेशनला आणलं. पोलिसांनी संजयची चौकशी केली असता, त्याचे २० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र चार-पाच वर्षांपासून पत्नीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता असं म्हटलं.
5 / 9
अनेकदा पती संजयने पत्नीचा पाठलाग केला. ती नोएडा आणि अन्य ठिकाणी जायची. त्याठिकाणी असणाऱ्या काही गार्डशी विचारणा केली असता संजयचा संशय खरा ठरला. मागील १ वर्षापासून ती मुलीलाही तिच्या सोबत घेऊन जात होती. त्यामुळे संजयचा राग अनावर झाला.
6 / 9
पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी संजयचा मोठा मुलगा कुणाल पाल आजोबा खेमचंद यांना घेऊन हॉस्पिटलला गेला होता. तो परतला नाही त्यामुळे अद्याप त्याची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही. सध्या संजयने कुणाल घरात नसल्याचं सांगितले आहे.
7 / 9
संजय पालच्या घरी एक पाळीव कुत्राही होता. आरोपी संजयने पोलिसांना सांगितले की, रेखा तिच्यासोबत कुत्र्यालाही घेऊन जात होती. शुक्रवारी रागाच्या भरात संजय रेखावर हल्ला करत होता तेव्हा पाळीव कुत्रा जोरजोरात भुंकत होता. मात्र संजय फावड्याने रेखावर वार करत राहिला.
8 / 9
कुत्र्याच्या भुंकण्याने आसपासच्या लोकांना हल्ल्यावेळी रेखा आणि ताशूचा आवाज ऐकायला गेला नाही. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय पालला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे अशी माहिती एसपी निपुण अग्रवाल यांनी दिली आहे.
9 / 9
तपासावेळी संजयवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर खाकीचा हिसका दाखवताच संजयने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. तर रेखाचा भाऊ नितीनने संजय आणि मुलगा कुणालविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.