शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धक्कादायक! मित्रासोबत मिळून पत्नीने केला प्लान, सुट्टीवर आलेल्या सैनिक पतीचा खेळ केला खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 1:11 PM

1 / 8
हरयाणाच्या चरखी दादरीमध्ये एका महिलेने पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासली. पत्नीने तिच्या मित्रासोबत मिळून सैनिक असलेल्या पतीची हत्या केली. मृत भारतीय सेनेत जवान होता. तो सुट्टीवर घरी आला असताना पत्नीने त्याची हत्या केली. जेव्हा हे समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
2 / 8
ही घटना दादरीच्य किशनपुरातील आहे. इथे सैनिक प्रवीण कुमार सुट्टीवर घरी आता होता. त्याचा मृतदेह संशायस्पद स्थितीत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रवीण सेनेत २२ सिग्नल रेजिमेंट मेरठमध्ये हवालदार पदावर तैनात होता.
3 / 8
पोलिसांनी जेव्हा प्रकरणाची चौकशी केली तेव्हा सत्य समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. कारण हत्या दुसरं कुणी नाही तर स्वत: सैनिकाच्या पत्नीने केली होती. यात तिने तिच्या एका मित्रासोबत मिळून हत्येचं सगळं प्लानिंग केलं होतं.
4 / 8
पोलिसांनुसार, पत्नीने आपल्या मित्रासोबत मिळून सैनिक पती ड्यूटीवर जाण्याच्या एक दिवसआधी त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या आणि नंतर गळा आवळून त्याची हत्या केली.
5 / 8
५ फेब्रुवारीला संशयास्पद स्थितीत प्रवीणचा मृतदेह आढळून आल्यावर परिवाराने त्याच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक सांगितलं होतं. परिवाराने पोलिसांना सांगितलं होतं की, रात्री तो जेवण करून झोपला होता आणि सकाळी उठला तेव्हा त्याला चक्कर येत होत्या. त्यानंतर त्याला दादरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.
6 / 8
पाच फेब्रुवारीला राजकीय सन्मानात प्रवीणवर अंत्यसंस्कार करण्यात आला. पण प्रवीणच्या मृत्यूच्या एक आठवड्यानंतर चौकशी समितीने जो पोस्टमार्टम रिपोर्ट दिला त्याने खळबळ उडाली.
7 / 8
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खुलासा झाला की, प्रवीणचा मृत्यू गळा दाबल्याने आणि त्याचा श्वास गुदमरल्याने झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यांनी हत्येसंबंधी चौकशी सुरू केली.
8 / 8
चौकशी दरम्यान प्रवीणची पत्नी मोनिका जास्त वेळ सत्य लपवून ठेवू शकली नाही. तिने सांगितलं की, तिने तिचा मित्र विक्कीच्या मदतीने पतीच्या हत्येचा प्लान केला होता. पोलिसांनुसार, मोनिकाने पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि रात्री उशीरा दोघांनी मिळून प्रवीणचा गळा दाबला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी