Wow what a look! Not only female IPS but also actresses, the first movie was become famous
Wow काय दिसते! महिला IPS नाही तर अभिनेत्रीही, पहिल्याच सिनेमाने फडकावला होता अटकेपार झेंडा By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 2:02 PM1 / 10आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद या 2011 च्या बॅचच्या आहेत. (Photo Credit - simalaprasad insta account)2 / 10गुंडांना दहशत वाटणाऱ्याखाकी वर्दीत असणाऱ्या दबंग महिला अधिकाऱ्याने आपल्या सुंदर सौंदर्यामुळे बॉलिवूडमध्ये देखील नावलौकिक मिळवला. 3 / 10पहिल्या परीक्षेतच सिमाला पीएससीमध्ये सिलेक्ट झाल्या. त्यांची पहिली पोस्टींग डीएसपी म्हणून करण्यात आली. 4 / 10सर्वात आधी त्या रतलामच्या डीएसपी बनल्या. मात्र, तरी देखील त्या अखिल भारतीय प्रशासकीय सेवांच्या परीक्षेसाठी तयारी करतच होत्या. 2011 साली त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली.5 / 10भोपाळच्या बरकतउल्ला विद्यापीठातून समाजशास्त्रातील पीजीचे शिक्षण घेताना त्याला सुवर्णपदकही मिळाले होते. 6 / 10इंदोरमध्ये सीएसपी विजय नगर आणि एएसपी पूर्व म्हणून काम केलेल्या सिमाला बॉलिवूड चित्रपटाच्या अलीफमध्ये मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटातील त्यांनी एका मुलाच्या बहिणीची भूमिका केली आहे, जो मदरशामध्ये शिकतो आणि डॉक्टर बनू इच्छितो.7 / 10शाळा, कॉलेजात असताना त्यांनी नृत्य आणि अभिनयात सहभाग घेतला होता. आयपीएस झाल्यानंतरही त्यांच्यातील एक कलाकार जिवंत होता. 8 / 10भागीरथ प्रसाद व साहित्यिक मेहरून्निसा परवेज यांची मुलगी सिमाला.त्यांनी डायरेक्टर जॅगम इमाम यांच्या अलिफ या सिनेमात रोल केला. हा सिनेमा २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियात इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल ऑफ क्वीसलँडमध्ये वर्ल्ड प्रीमीयर म्हणून प्रदर्शित झाला होता आणि २०१७ साली हा सिनेमा रिलीज झाला होता.9 / 10सिमाला यांच्या म्हणण्यानुसार, 'शाळा व महाविद्यालयीन काळात त्यांनी अनेक नाटकांत भूमिका केल्या. त्यांना केवळ अभिनयाची आवडच नव्हती तर ती एक उत्तम अभिनेत्रीही आहे. अभिनयाची त्यांना आधीपासूनच माहिती होती. लोकांना जाणीव व्हावी यासाठी एखाद्याने चित्रपटात काम केले पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी मिळालेली ऑफर नाकारली नाही.10 / 10दिग्दर्शक जगम इमाम आपला अलिफ चित्रपटाची कास्टिंग करत होते. या दरम्यान, त्यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात सिमलाची भेट घेतली. सिमलाचे साधेपणा आणि सौंदर्य पाहून जगमने त्याच्याबरोबर भेटीची वेळ मागितली. चित्रपटाची पटकथा वाचल्यानंतर त्यांनी लगेचच या भूमिकेसाठी सिमाला यांनी ऑफर दिली. आणखी वाचा Subscribe to Notifications