नाशिक : काठे गल्ली-पखालरोड भागात मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांच्या ५७ दुचाकींसह १३ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुफान दगडफेकीत ३१ पोलीस अधिकारी, कर्मचारी मध्यम ते किरकोळ जखमी झाले आहेत.
सरकारी नोकरीची तयारी करताय? 'या' 6 संस्थांमध्ये 2500 पदांची मेगाभरती, संधी गमावू नका...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 21:36 IST
1 / 8Government Jobs for Graduates: तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. सध्या देशातील विविध प्रतिष्ठित संस्थांमध्ये सुमारे 2500 पदांसाठी भरती सुरू आहे. ही पदभरती रेल्वे, बँक, उच्च न्यायालय, अभियांत्रिकी आणि सार्वजनिक क्षेत्र...अशा विविध क्षेत्रात उपलब्ध आहेत. या भरतींशी संबंधित सर्व महत्वाच्या माहिती येथे जाणून घ्या...2 / 8रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिपसाठी मोठी संधी:- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) ने नागपूर विभागात 933 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या रिक्त जागा वेगवेगळ्या ट्रेडमध्ये असून, आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिले जाईल. इच्छुक उमेदवार apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.3 / 8रेल्वेमध्ये आणखी एक भरती: 1007 पदे:- SECR ची आणखी एक भरती बिलासपूर विभागासाठी आहे, ज्यामध्ये 1007 अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मे 2025 आहे. किमान वय 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असावे.4 / 8आयडीबीआयमध्ये अधिकारी होण्याची संधी:- आयडीबीआय बँक स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या 119 पदांसाठी भरती करत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025 आहे. बीई/बीटेक आणि इतर पदवीधर उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.5 / 8एनसीआरटीसीमध्ये अभियंता आणि मानव संसाधन भरती:- राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (NCRTC) मध्ये कनिष्ठ अभियंता, सहाय्यक मानव संसाधन यासह 72 पदांसाठी भरती सुरू आहे. पगार 18,250 ते 75,850 रुपयांपर्यंत असेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल आहे. फॉर्म भरण्यासाठी ncrtc.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.6 / 8पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयामध्ये स्टेनोग्राफर भरती:- ग्रेड III स्टेनोग्राफरची भरती उच्च न्यायालयात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2025 आहे. या रिक्त पदासाठी उमेदवारांकडे पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज अधिकृत वेबसाइट sssc.gov.in वर करता येईल.7 / 8GRSE व्यवस्थापक आणि महाव्यवस्थापक भरती:- गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (GRSE) ने 40 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अभियांत्रिकी आणि पदवीधर विद्यार्थी 26 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला grse.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.8 / 8या सर्व नोकऱ्यांसाठी पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख वेगवेगळी आहे. जर तुम्ही पात्र असाल तर ताबडतोब संबंधित वेबसाइटवर जाऊन अर्ज करा. सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी गमावू नका.