top 10 toughest exams in the world 2023 list here indias three and americas five exam in this list
जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये भारतातील तीन, टॉपमध्ये IIT-JEE चा समावेश By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 4:37 PM1 / 11नवी दिल्ली : भारताव्यतिरिक्त अनेक देशांमध्ये अशा परीक्षा आहेत, ज्या उत्तीर्ण होणे खूप कठीण आहे. 'द वर्ल्ड रँकिंग' ने अलीकडेच अशा 10 परीक्षा आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रसिद्ध केल्या आहेत, ज्या जगातील सर्वात कठीण परीक्षा आहेत. यामध्ये भारतातील तीन परीक्षांचा समावेश आहे, तर अमेरिकेच्या पाच परीक्षांचा समावेश आहे. मात्र, जगातील सर्वात कठीण परीक्षा चीनची मानली जाते. तर जगातील सर्वात कठीण 10 परीक्षा कोणत्या? त्याबद्दल जाणून घ्या....2 / 11गाओकाओ ही चिनी महाविद्यालयीन प्रवेश परीक्षा आहे, जी जगातील सर्वात कठीण 10 परीक्षांमध्ये गणली जाते. 3 / 11जगातील दुसरी सर्वात कठीण परीक्षा भारताची IIT-JEE आहे, जी भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा आहे.4 / 11भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा, केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा (CSE) या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. 5 / 11मेन्सा ही जगातील सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे, ज्यामधील सदस्यांचा IQ लोकांच्या 98 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त आहे, ज्यामुळे ते जगातील टॉप 2 टक्क्यांमध्ये येतात. यामध्ये सामील होण्यासाठी मेन्सा चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.6 / 11ग्रॅज्युएट रेकॉर्ड एग्जाम (GRE) ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे आणि ती या यादीत 5 व्या क्रमांकावर आहे. ही परीक्षा परदेशात शिकण्यासाठी घेतली जाते.7 / 11चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट (CFA) परीक्षा ही आर्थिक उद्योगातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी 100 हून अधिक देशांतील एक लाखाहून अधिक उमेदवार CFA अटेंप्ट करतात.8 / 11सिस्को सर्टिफाइड इंटरनेटवर्किंग एक्सपर्ट (CCIE) परीक्षा ही वित्त क्षेत्रातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. ही जगातील 7 वी सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.9 / 11ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE), ही अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन परीक्षा आहे. जी भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्येही घेतली जाते. 10 / 11युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसन्सिंग परीक्षा (USMLE), ही परीक्षा राज्य वैद्यकीय मंडळ (FSMB) आणि राष्ट्रीय वैद्यकीय परीक्षक मंडळ (NBME) द्वारे प्रायोजित आहे.11 / 11कॅलिफोर्निया बार परीक्षेत सामान्य बार परीक्षा आणि वकील परीक्षा यांचा समावेश होतो. सामान्य बार परीक्षेत पाच निबंध प्रश्न, मल्टीस्टेट बार परीक्षा (MBE) आणि एक परफॉर्मन्स टेस्ट (PT) असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications