एका MBBS डॉक्टरचा पगार किती असतो?; खासगी की सरकारी, जास्त कमाई कुठे.... By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 1:37 PM
1 / 10 डॉक्टरांना ना केवळ भारतात तर जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी असते. मेडिकल प्रॅक्टिशनर हे आर्थिकदृष्ट्या मजबूत नसतात तर समाजात लोकांसाठी दिल्या जाणाऱ्या योगदानामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे. डॉक्टर नेमकं किती कमावतात हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. 2 / 10 मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नईसारख्या शहरात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांना कमाल किती वेतन दिलं जाते, जे डॉक्टर एखाद्या विशिष्ट आजाराच्या उपचारातील तज्ज्ञ असतील त्यांचा सुरुवातीचा पगार किती असतो याबाबत सर्वकाही पुढे बघूया. 3 / 10 NEET परीक्षेनंतर जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेत विद्यार्थी पहिल्या स्तरात जेव्हा एमबीबीएस डॉक्टर बनतात तेव्हा त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दर महिना ५० हजार ते ८० हजार वेतन दिले जाते. 4 / 10 AIIMS सारख्या हॉस्पिटलमध्ये कमाल वेतन १ लाखापर्यंतही असू शकते. तर खासगी दवाखान्यात एन्ट्री लेवलच्या डॉक्टरांना ४० ते ७० हजार पगार दिला जातो. 5 / 10 डॉक्टर क्षेत्रात जर ५ ते १० वर्षाचा अनुभव आला तर ते मिड लेवल डॉक्टर बनतात. या डॉक्टरांना दिले जाणारे वेतन ८० हजारांपासून दीड लाखांपर्यंत असू शकते. तर खासगी दवाखान्यात मिड लेवल एमबीबीएस डॉक्टरांना दर महिना १ लाख ते २ लाखांपर्यंत पगार दिला जातो. 6 / 10 MBBS डॉक्टरांना १० वर्ष आणि त्यापेक्षा अधिक अनुभव झाला असेल तर त्यांच्या पदासह त्यांना मिळणारा पगारही वाढतो. सरकारी हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ एमबीबीएस डॉक्टरांना दीड लाख ते अडीच लाख रुपये महिना पगार मिळतो. तर खासगी हॉस्पिटलमध्ये २ लाख ते ४ लाखांपर्यंत वेतन मिळू शकते. 7 / 10 असे डॉक्टर ज्यांना कामाचा जास्त अनुभव आहे त्यांना सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर्स म्हटलं जातं. खासगी हॉस्पिटलमध्ये अशा डॉक्टरांना महिन्याला ५ लाख ते १० लाखाहून अधिक पगार दिला जातो. काही डॉक्टर्स स्वत: हॉस्पिटल उघडून वैद्यकीय सेवा देतात. 8 / 10 जे डॉक्टर रुग्णालये किंवा वैद्यकीय संस्थांमध्ये उच्च व्यवस्थापन पदांवर आहेत, त्यांचे मासिक वेतन त्यांच्या काम आणि पदानुसार ठरविले जाते. ते दरमहा १० लाख रुपये किंवा त्याहून अधिक पगार घेऊ शकतात. 9 / 10 एखाद्या क्षेत्रात स्पेशलिस्ट डॉक्टरांनाही लाखोने पगार मिळतो. विशेष कौशल्य, कामाचे ठिकाण, वेतनश्रेणी इत्यादी आणि इतर कारणांमुळे येथे नमूद केलेल्या डॉक्टरांच्या दरमहा पगारात बदल होऊ शकतो. 10 / 10 येथे फक्त खासगी आणि सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांच्या पगाराचा उल्लेख आहे. आणखी वाचा