Bird Sanctuaries In Rajasthan To Explore and Spot Some Rare Bird Species
पक्षीप्रेमींसाठी 'भरतपूर' अभयारण्य ठरेल खास पर्वणी By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 12:30 PM1 / 11राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील पक्षी अभयारण्य जगप्रसिद्ध आहे. या अभयारण्याला केवलादेव राष्ट्रीय अभयारण्य या नावानेही ओळखले जाते. (सर्व छायाचित्रे - प्रशांत खरोटे)2 / 111971 साली या अभयारण्याला संरक्षित क्षेत्र म्हणून राजस्थान वन विभागाने घोषित केले. 3 / 111985 साली या अभयारण्याला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. रामसर दर्जा प्राप्त झाला. तेव्हापासून हे अभयारण्य प्रकाशझोतात आले.4 / 11आग्रा शहरापासून हे अभयारण्य 50 किलोमीटर अंतरावर आहे. विविध प्रकारच्या देशी-विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांसह विविध वन्यजीवांच्या प्रजातीही येथे सहज पाहावयास मिळतात. 5 / 11रंगीत करकोचा, सारस, राखी बगळा, जांभळा बगळा यांसारख्या स्थलांतरीत पक्ष्यांसह पाणथळ जागेवरील चक्रवाक, टिबुकली, थापट्या आदि बदकांचे विविध प्रकारदेखील येथे सहज पाहावयास मिळतात. 6 / 11घनदाट वृक्षराजीमधून वाहणारा तलाव आणि त्यामुळे तयार झालेले पाणथळ पक्ष्यांचे हक्काचे मुक्कामाचे ठिकाण आहे. 7 / 11सध्या हिवाळा सुरू असल्याने या अभयारण्यात पक्ष्यांचा जणू हिवाळी अधिवेशनच बघावयास मिळत आहे.8 / 11मागील काही दिवसांपासून येथे पक्षीनिरिक्षक व वन्यजीव छायाचित्रकारांसह पर्यटकांचीही गर्दी पाहावयास मिळत आहे.9 / 11मागील काही दिवसांपासून येथे पक्षीनिरिक्षक व वन्यजीव छायाचित्रकारांसह पर्यटकांचीही गर्दी पाहावयास मिळत आहे.10 / 11मागील काही दिवसांपासून येथे पक्षीनिरिक्षक व वन्यजीव छायाचित्रकारांसह पर्यटकांचीही गर्दी पाहावयास मिळत आहे.11 / 11मागील काही दिवसांपासून येथे पक्षीनिरिक्षक व वन्यजीव छायाचित्रकारांसह पर्यटकांचीही गर्दी पाहावयास मिळत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications