शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळीसाठी बाजारात आले ग्रीन फटाके; काय आहे यामध्ये खास? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 2:27 PM

1 / 6
दिवाळीत फुटणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषण होतं. मागील वर्षी दिल्लीत प्रचंड प्रदूषण निर्माण झालं होतं. ते कमी करण्यासाठी यंदा बाजारात ग्रीन फटाक्यांची विक्री केली जात आहे. यापूर्वी तुम्ही हे फटाके ऐकले असतील मात्र पहिल्यांदाच हे बाजारात विक्रीसाठी आलेत.
2 / 6
ग्रीन फटाके ओळखण्यासाठी विशेष लोगो फटाक्यांच्या पाकिटावर देण्यात आला आहे. दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन फटाके वाजविण्याचे आदेश दिले होते.
3 / 6
इको फ्रेंडली आणि प्रदूषणविरहीत फटाक्यांची विक्री दिल्लीतील बाजारात होत आहे. राष्ट्रीय पर्यावरण इंजिनिअरिंग इन्स्टिट्युटने अधिकृतपणे जवळपास 550 फटाक्यांना मान्यता दिली आहे.
4 / 6
ग्रीन फटाके वाजविताना मोठा आवाज आणि आकर्षक रोषणाईदेखील पाहायला मिळणार आहे. यात वापरण्यात आलेल्या घटकांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
5 / 6
सामान्य फटाक्यांच्या तुलनेत ग्रीन फटाके महाग आहेत. होलसेल बाजारात हे फटाके 150 रुपयांपासून दर सुरु होतात. सध्या बाजारात ग्रीन फटाक्यांची संख्या कमी असली तरी जास्तीत जास्त फटाके आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
6 / 6

टॅग्स :Diwaliदिवाळीfire crackerफटाके