शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

…तर ५-१० वर्ष सूर्याचा प्रकाश दिसणार नाही; बर्फात दडलेलं रहस्य अखेर उलगडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 3:33 PM

1 / 10
एकेकाळी अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडमध्ये शेकडो ज्वालामुखींचा उद्रेक होत असे. त्यापैकी ६९ भयंकर ज्वालामुखी नुकतेच सापडले आहेत.. हिमयुगाच्या काळात त्यांचा इतका भयंकर उद्रेक झाला होता जो आधुनिक इतिहासात कधीही न पाहिलेला होता.
2 / 10
या संशोधनामागील शास्त्रज्ञांनी सांगितले की, हे ज्वालामुखी उद्रेक आपल्याला हवामान बदलाबाबत (Climate Change) पृथ्वीवर होणाऱ्या गंभीर परिणामाचे संकेत देतात. हिमयुगात अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडच्या आसपास ६९ ज्वालामुखींमध्ये भयानक स्फोट झाले होते. जे आधुनिक इतिहासातील कोणत्याही ज्वालामुखीच्या उद्रेकापेक्षा जास्त धोकादायक आणि प्रचंड होते.
3 / 10
कोपनहेगन विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञांनी ही स्टडी केली आहे. सामान्यतः ज्वालामुखीच्या उद्रेकाची गृहीतक प्रलयातून तयार केली जाते. ज्यामध्ये एक प्रचंड स्फोट, जाड आणि गडद रंगाच्या राखेचे दृश्य, वातावरण आणि त्याच्या वर पोहोचलेला धुराचा थर आणि खाली जमिनीवर वाहणारी लावाची नदी असं या नवीन शोधात आढळून आले आहे.
4 / 10
ज्वालामुखीचा उद्रेक होणं याचा अर्थ आपण पृथ्वीच्या हवामान बदलासाठी किती संवेदनशील असलं पाहिजे हे दाखवतं. जर या नैसर्गिक घटना अधूनमधून घडल्या नाहीत तर संतुलन राखणे कठीण होईल. प्राध्यापक अँडर्स वेन्सन म्हणतात की, आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक आपण पाहिला नाही. मात्र त्याला कधीही पाहू शकतो. २०१० मध्ये, इजाफजेलाजोकुल ज्वालामुखीमुळे संपूर्ण युरोपमधील हवाई वाहतूक ठप्प झाली. पण अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडमध्ये सापडलेल्या स्फोटांचे पुरावे यापेक्षा कितीतरी पटीने अधिक भयावह आणि प्रचंड होते.
5 / 10
अँडर्स वेन्सन म्हणाले की, गेल्या २५०० वर्षांत असे उद्रेक झालेले नाहीत. अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडमध्ये शास्त्रज्ञांच्या पथकाने बर्फाचे जाड थर ड्रिल केले तेव्हा ही माहिती समोर आली. बर्फाच्या आतील नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ६० हजार वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकाची तीव्रता आणि प्रमाण किती होते. गेल्या २५०० वर्षांतील कोणत्याही ज्वालामुखीच्या उद्रेकापेक्षा हे अधिक भयावह होते असं आढळून आले.
6 / 10
अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडमध्ये ८५ ज्वालामुखीच्या उद्रेकाचे पुरावे वैज्ञानिकांनी शोधले आहेत. हे स्फोट जागतिक स्तरावरचे होते. म्हणजेच त्याने संपूर्ण पृथ्वीला आपल्या कवेत घेतलं होतं. यापैकी ६९ ज्वालामुखी उद्रेक असे होते की ते १८१५ मध्ये इंडोनेशियातील तंबोरा पर्वतापेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली आणि धोकादायक होते. तंबोरा उद्रेकामुळे, इतके सल्फ्यूरिक ऍसिड सोडले गेले ज्याने संपूर्ण स्ट्रॅटोस्फियर व्यापले. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येत नव्हता. अनेक वर्ष जागतिक हिवाळ्याचा सामना करावा लागला.
7 / 10
तंबोरा पर्वताच्या(Mount Tambora) उद्रेकामुळे अनेक सुनामी आल्या. अनेक भागात दुष्काळ पडला होता. अनेक भागात लोक उपासमारीचे बळी ठरले होते. याशिवाय सुमारे ८० हजार लोकांचा मृत्यू झाला. ज्वालामुखी उद्रेक रिक्रिएट करण्यासाठी बर्फाच्या कोरमधून छिद्र करणे हा एक सोपा मार्ग आहे आणि त्याचे बरेच फायदे आहेत. यावरून स्फोटाची तीव्रता, भीषणता याची अचूक कल्पना येते. बर्फाच्या गाभ्यात सल्फ्यूरिक ऍसिड जितके जास्त जाईल तितका मोठा स्फोट असेल असं मानलं जातं.
8 / 10
प्रो. अँडर्स म्हणाले की आता आपल्याकडे ज्वालामुखीच्या उद्रेकाची ६० हजार वर्षांची आकडेवारी आहे. आपण सुरुवातीच्या हिमयुगापासून आधुनिक काळापर्यंत उद्रेकांची कल्पना करू शकतो. त्यांची गणना करू शकतो. मोठे उद्रेक दुर्मिळ आहेत, म्हणून त्यांचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या टाइमलाइनची आवश्यकता आहे. जी आमच्याकडे आता आहे. आता प्रश्न असा आहे की, पुढचा मोठा स्फोट कधी होणार?
9 / 10
आम्ही अभ्यास केलेल्या रिपोर्टमध्ये तीन ज्वालामुखीचा विस्फोट अतिशय भयानक, शक्तिशाली आणि मोठा होता. त्यांना VEI-8 म्हणतात. आपण काही शेकडो किंवा हजारो वर्षांत अशा स्फोटाची अपेक्षा करू शकतो. कारण तंबोरा पर्वतासारखे मोठे विस्फोट दर हजार वर्षांनी एकदा किंवा दोनदाच होतात. किंवा कधीकधी ते थोडे लवकर होऊ शकते. तंबोरासारखा विस्फोट पुन्हा झाला तर?
10 / 10
जर तंबोरा पर्वतासारखा विस्फोट पुन्हा झाला तर वातावरणात भयंकर बदल होईल. पाच ते दहा वर्षे ग्लोबल कूलिंग असेल. म्हणजेच सूर्यप्रकाश कमी पोहोचेल किंवा पोहोचणार नाही. तापमानात कमालीची घट होईल. बर्फयुगासारखी परिस्थिती असू शकते. कोरडे असू शकते. भूकंप होऊ शकतात. लोकांना अन्न आणि पाणी मिळणे बंद होऊ शकते. सगळीकडे अराजकता पसरेल. हा अभ्यास नुकताच क्लायमेट ऑफ द पास्ट या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.