शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाबो: 89 वर्षांचे वडील अन् 65 वर्षांची बहीण; फॉर्म्युला वनच्या माजी बॉसला पुत्ररत्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 12:46 PM

1 / 11
जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असताना सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. पण, फॉर्म्युला वन शर्यतीचे माजी प्रमुख बर्नी एस्लेस्टन यांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे.
2 / 11
एस्लेस्टन हे वयाच्या 89व्या वर्षी बाप झाले आहेत. त्यांची पत्नी फॅबिआना फ्लोसी हिचं वय हे बर्नींपेक्षा निम्मे आहे. या जोडप्याला पुत्ररत्न प्राप्ती झाली.
3 / 11
एस्लेस्टन यांना पाच नातवंड आहेत आणि येत्या ऑक्टोबरमध्ये ते 90 वर्षांचे होतील.
4 / 11
त्यांनी सांगितले की,''आम्हाला मुलगा झाला आहे आणि त्याचं नाव ऐस असं ठेवलं आहे. मला अभिमान वाटतोय.''
5 / 11
स्वित्झर्लंड येथील घरी एस्लेस्टन आणि फॅबिआना सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत.
6 / 11
एस्लेस्टनला आधी तीन मुली आहेत आणि मुलगा झाल्यानं त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
7 / 11
एस्लेस्टन यांच्या 187 कोटींच्या संपत्तीचा तो एकमेव वारस आहे.
8 / 11
नव्या बाळाची मोठी बहीण 65 वर्षांची आहे. एस्लेस्टन यांची पहिली पत्नी एव्ही बॅमफोर्ड यांची ती मुलगी आहे. त्यानंतर दुसऱ्या पत्नी स्लॅव्हिका रॅडीकनं तमारा ( 35) आणि पेट्रा ( 31) या दोन मुलींना जन्म दिला.
9 / 11
2012मध्ये एस्लेस्टन यांनी मार्केटिंग डायरेक्टर फॅबिआना हिच्याशी विवाह केला. तिनं क्रोएशियन मॉडल रॅडीकसोबत 2009मध्ये घटस्फोट घेतला होता.
10 / 11
2009च्या वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स परिषदेत एस्लेस्टन आणि फॅबिआना यांची भेट झाली.
11 / 11
एका मासेमार करणाऱ्या कुटुंबात 1930मध्ये एस्लेस्टन यांचा जन्म झाला. 1949मध्ये त्यांनी मोटरसायकल शर्यतीत पहिले पाऊल टाकले.
टॅग्स :carकार