शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Fact Check: रेल्वेचे कन्फर्म रिझर्व्हेशन मिळाले नाही, तर प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास करणे शक्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 11:34 AM

1 / 11
भारतीय रेल्वेतून कुठेही लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल, तर कन्फर्म तिकीट असणे आवश्यक आहे. मात्र, कन्फर्म तिकीट मिळणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे.
2 / 11
अनेक रेल्वे गाड्यांमध्ये रिझर्व्हेशन कन्फर्म असल्याशिवाय प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. मात्र, शेवटच्या क्षणी प्रवास करण्याची वेळ आली, तर अनेक जण तत्काळ तिकिटाचा पर्याय निवडतात.
3 / 11
मात्र, अनेकदा तत्काळ तिकीटही मिळत नाही. अशावेळी प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास करणे शक्य असल्याचे सांगितले जाते. हा नियम वापरून अगदी इमर्जन्सीच्या वेळेस तुम्ही रेल्वेने प्रवास करू शकता.
4 / 11
आपल्याकडे कन्फर्म रिझर्व्हेशन नसेल, तर प्लॅटफॉर्म तिकिटावर आपण प्रवासाला सुरुवात करू शकता. प्लॅटफॉर्म तिकीट प्रवासाची मुभा देते असे नियम सांगतो, असे म्हटले जाते.
5 / 11
गेल्या काही दिवसांपासून काही इंग्रजी आणि हिंदी भाषिक वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवर अशा प्रकारची माहिती देण्यात आली असून, सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. सदर माहिती चुकीची असल्याचा संशय आल्यावर याबाबत पडताळणी करण्यात आली.
6 / 11
भारतीय रेल्वेचे नियम, कायदे याची माहिती घेतल्यानंतर प्लॅटफॉर्म तिकिटावरून प्रवासाला मान्यता देणारा कोणताही नियम आढळून आला नाही. याबाबत खातरजमा करण्यासाठी मध्य रेल्वेशी संपर्क साधला.
7 / 11
मुंबईतील मध्य रेल्वेचे जनसंपर्क प्रमुख शिवाजी सुतार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत माहिती दिली. ‘लोकमत’शी बोलताना शिवाजी सुतार म्हणाले की, प्लॅटफॉर्म तिकिटावर रेल्वे प्रवासाला मुभा देणारा कोणताही नियम भारतीय रेल्वेचा नाही.
8 / 11
प्लॅटफॉर्म तिकिटावर रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात आल्याची माहिती चुकीची आहे. असा कोणताही निर्णय रेल्वेकडून घेण्यात आलेला नाही. प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास करणे अवैध आहे. प्रवाशांनी खोट्या माहितीच्या आधारे प्रवास करू नये, ते चुकीचे आहे, असे आवाहन शिवाजी सुतार यांनी यावेळी बोलताना केला.
9 / 11
प्लॅटफॉर्म तिकिटावर केवळ त्या स्थानकावर प्रवेश करणे आणि निर्धारित वेळेपर्यंत थांबण्याची परवानगी भारतीय रेल्वे देते. त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकिटावरून प्रवास करण्यासंदर्भात देण्यात येत असलेली माहिती चुकीची आहे, असे यावरून स्पष्ट होते.
10 / 11
दरम्यान, भारतीय रेल्वेच्या तिकिटासाठी अनेक खटपटी कराव्या लागतात. प्रवास सुरू करण्यापूर्वी रेल्वेचे काही साधे नियम माहिती असणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.
11 / 11
कोरोना कालावधीत भारतीय रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या कालावधीत रेल्वेने आपल्या मालवाहतूक सेवेवर भर देत त्यातून उत्तम मिळकत केल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे