शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Odisha Forest Fire: ओडिशात अग्नितांडव; मात्र व्हायरल होणारे हे फोटो नेमके कुठले आहेत?; नक्की जाणून घ्या सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 7:52 AM

1 / 11
संपूर्ण देशात उन्हाळ्याची चाहुल लागलीय. तापमानाचा पारा चढण्या सुरुवात झालीय. याच काळात जंगलांना आग लागण्याच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ झालेली असते. भारतातही अशा घटना वाढताना दिसत आहेत.
2 / 11
ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात सिमलीपाल नॅशनल पार्कही (Fire in Simlipal Forest of Odisha Environmentalist concern over situation) सध्या वणव्याच्या आगीत धुमसत आहे. या राष्ट्रीय उद्यानात मागील 10 दिवसांपासून भयंकर आग लागलीय. अद्यापही ही आग नियंत्रणात आलेली नाही. मात्र, याकडे अनेकांचं दुर्लक्ष झालेलं दिसत आहे.
3 / 11
गेल्या 10 दिवसांपासून या जंगलाला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे (#OdishaIsBurning). इंडियन एक्‍सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पार्कमध्ये एकूण 399 फायर पॉइंट्सची ओळख झाली आहे. हा पार्क लाल सिल्‍क कॉटन झाडांसाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे याच झाडांवरून या पार्कला नाव मिळाले आहे. कारण ही झाडे याच भागात बघायला मिळतात. या जंगलात 3000 प्रकारची झाडे आणि वनस्पती आहेत. यात 94 प्रकारच्या प्रजाती एकट्या ऑर्किडच्या आढळून येतात.
4 / 11
या जंगलात अथवा नॅशनल पार्कमध्ये पानी आणि जमिनीवर राहू शकतील असे 12 प्रकारचे प्राणी, 29 प्रकारचे सरपटणारे प्राणी, 264 प्रकारचे पक्षी आणि 42 प्रकारचे सस्तन प्राणी आहेत.
5 / 11
माध्यमांतील माहितीनुसार, 1000 कर्मचारी आणि 250 फॉरेस्‍ट गार्ड्स आग विझविण्याच्या कामात लावण्यात आले आहेत. तसेच 45 अग्नीशमन दलाच्या गाड्या आणि 240 ब्‍लोअर मशीनच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. मात्र याचदरम्यान काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
6 / 11
सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून खाक झालेले जंगल, जखमी झालेले वाघ आणि हेलिकॉप्टरने आग विझवतानाचे फोटो शेअर करण्यात येत आहे. तसेच हे फोटो शेअर करुन अ‍ॅमेझॉन जंगलातील आगीचा जेवढा गाजावाजा झाला तेवढा ओडिशातील आगीचा झाला नाही, असं सांगण्यात येत आहे. मात्र या फोटोची सत्यता तपासली असता हे फोटो ओडिशामधील नसल्याचे समोर येत आहे.
7 / 11
ओडिशातील जंगलाला आग लागली ही बातमी खरी आहे. परंतु, व्हायरल फोटो दुसऱ्या देशांमधील आगीचे जुने फोटो आहेत.
8 / 11
काळ्या रंगाच्या या वाघांचा हा फोटो ओडिशामध्ये सध्या लागलेल्या आगीमुळे भाजलेल्या वाघांचा नाही. हा फोटो ओडिशामध्ये आढळणाऱ्या ‘ब्लॅक टायगर’ नामक प्रकारच्या वाघांचा आहे. माजी वनाधिकारी संदीप त्रिपाठी यांनी गेल्या वर्षी जुन 2020 मध्ये हो फोटो शेअर केला होता. या वाघांना मेलानिस्टिक टायगर्स असेही म्हणतात. यांच्या अंगावर काळा रंग अधिक असतो.
9 / 11
आगीवर पाणी टाकणाऱ्या हेलिकॉप्टरचे फोटो अमेरिकेतील आहेत. 2017 साली तेथील लॉस एंजल्स शहर प्रशासनाने वणव्याला रोखण्यासाठी लॉकहिड मार्टिन सायकॉर्स्की कंपनीचे दोन हेलिकॉप्टर खरेदी केले होते. हे त्या हेलिकॉप्टरचे फोटो आहेत.
10 / 11
जुने आणि असंबंधित फोटो ओडिशाच्या सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानाला लागलेल्या आगीचे म्हणून फिरत आहेत. ते फोटो ओडिशातील नाहीत. परंतु, ओडिशाच्या जंगलात लागलेल्या आगीला रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असून, मोठी वृक्षहानी झाली आहे.
11 / 11
तसेच ओडिशा सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जंगलाचा मुख्य भाग सुरक्षित आहे आणि संरक्षित प्रजातींना या घटनेमुळे कसल्याही प्रकारचे नुकसान पोहोचलेले नाही. ही आग बफर झोनमध्ये लागली होती आणि फुटहील एरिया सध्या नियंत्रणात आहे.
टॅग्स :fireआगOdishaओदिशाTigerवाघSocial Viralसोशल व्हायरल