शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटांबद्दल मोठी बातमी; RBI नं दिली लोकांना महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 7:39 PM

1 / 11
५०० रुपयांच्या नोटेबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आपल्या सगळ्यांकडे ५०० रुपयांची नोट असेलच त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी गरजेची आहे. गेल्या काही दिवसांपासून ५०० रुपयांच्या नोटेबद्दल होणारा दावा तुम्हाला ठाऊक आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.
2 / 11
या दाव्यात असं सांगितलं होतं की, ५०० रुपयांची ती नोट घेऊ नये ज्यामध्ये हिरव्या रंगाची पट्टी आरबीआय गवर्नरच्या सहीजवळ नसून गांधींजींच्या फोटो जवळ असते. PIB फॅक्ट चेकमध्ये हा दावा चुकीचा असल्याचं निष्पन्न झालं आहे.
3 / 11
RBI नुसार या प्रकारच्या दोन्ही नोटा व्यवहारासाठी मान्य असतात. पीआयबी फॅक्ट चेकद्वारे वेळोवेळी सोशल मीडियात पसरणाऱ्या चुकीच्या अफवा आणि मेसेजबाबत पडताळणी करून त्याची सत्यता सांगितली जाते. ज्यामुळे चुकीच्या मेसेजपासून लोकांचं होणारं नुकसान टाळता येते.
4 / 11
यापूर्वीही असा दावा करण्यात आला होता की, ५, १० आणि १०० रुपयांच्या नोटा बंद झाल्या आहेत. सोशल मीडियात हा मेसेज व्हायरल झाल्यामुळे अनेकजण चिंतेत होते. त्यानंतर या मेसेजबाबत प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरा(PIB)कडून ट्विट करून आरबीआय(RBI)कडून अशी कोणतीही घोषणा झाली नाही असं स्पष्ट केले होते.
5 / 11
५,१० आणि १०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याची बातमी पूर्णत:खोटी आणि लोकांची दिशाभूल करणारी होती. या व्हायरल होणाऱ्या बातम्यांवर लोकांनी विश्वास ठेऊ नये. ५,१० आणि १०० रुपयांच्या नोटा आधीसारख्या चलनात राहणार असल्याचं RBI नं सांगितले होते.
6 / 11
५०० रुपयांची नोट कशी ओळखावी? याबाबत माहिती जाणून घ्या. 1)५०० रुपयांची नोट लाईटच्या प्रकाशासमोर ठेवली असता त्याठिकाणी पुसट ५०० लिहिल्याचं दिसून येते. 2)डोळ्यासमोर ४५ डिग्री अँगलवर ठेवल्यावरच तुम्हाला हा आकडा दिसेल.
7 / 11
3) देवनागरीमध्ये ५०० आकडा लिहिलेला असेल. 4)जुन्या नोटांच्या तुलनेत महात्मा गांधी यांचा फोटोचं ओरिएंटेशन आणि पोजिशन थोडी वेगळी असेल. 5)नोटांना थोडंसं मोडल्यावर सिक्युरिटी थ्रीडचा रंग हिरव्यापासून निळा झालेला दिसून येतो.
8 / 11
6)जुन्या नोटांच्या तुलनेत गारंटी क्लॉज, गवर्नर स्वाक्षरी, प्रॉमिक क्लॉज आणि आरबीआय(RBI) लोगो उजवीकडे हलवण्यात आला आहे. 7)महात्मा गांधी यांचा फोटो आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्कही ५०० रुपयांच्या नव्या नोटेवर तुम्हाला दिसून येईल.
9 / 11
8) वरच्या बाजूच्या डाव्या व उजव्या बाजूच्या तळाशी लिहिलेले क्रमांक डावीकडून उजवीकडे मोठे होतात.9) याठिकाणी लिहिलेला ५०० चा आकडा हा रंग बदलताना दिसतो. त्याचा रंग हिरव्यापासून निळा झालेला आढळून येईल.
10 / 11
10) उजवीकडे अशोक स्तंभ आहे. उजव्या बाजूच्या वर्तुळ बॉक्स आहे ज्यामध्ये ५०० हा आकडा लिहिलेले आहेत. उजव्या आणि डाव्या बाजूला ५ ब्लीड रेषा आहेत ज्या ठळक दिसून येतात.11) नोटांवर छापण्यात आलेलं वर्ष लिहिलेलं असतं.
11 / 11
12) स्लोगनसोबतच स्वच्छ भारत अभियानाचा लोगो आहे. 13) त्यासोबतच मध्यभागी भाषेचे पॅनेल आहे. 14) भारतीय ध्वजासोबत लाल किल्ल्याचा फोटोही नव्या नोटांवर छापण्यात आला आहे. 15) देवनागरी भाषेत ५०० आकडा लिहिण्यात आला आहे. दृष्टिहिन लोकांसाठी महात्मा गांधी फोटो, अशोक स्तंभाचं प्रतीक आणि ब्लीड लाईन ठळक अक्षरात उमटवण्यात आले आहेत.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक