३१ मार्च ही तारीख जवळ येत आहे, या तारखेपूर्वी तुम्हाला पाच अशी काही कामं आहेत ती पूर्ण करावी लागणार आहेत अन्यथा तुम्हाला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. पाहूयात तर मग काय आहेत ही पाच कामं-१) जुन्या नोटा बदलण्याची शेवटची संधीनोटाबंदीमुळे जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या या जुन्या नोटा बदली करण्यासाठी नागरिकांना आता आरबीआयमध्ये जावे लागत आहे. मात्र, आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक आॅफ इंडियामध्येही जुन्या नोटा बदली करण्याची शेवटची तारीख ही ३१ मार्चपर्यंतच आहे. म्हणजेच जर ३१ मार्चपर्यंत तुम्ही जुन्या नोटा बदली केल्या नाहीत तर तुम्हाला पून्हा संधी मिळणार नाही. त्यामुळे ही संधी सोडू नका.२) इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीखजर तुम्ही २०१५-१६ या आर्थिक वषार्चं टॅक्स रिटर्न फाइल केलं नाहीये तर मग ३१ मार्च २०१७ पूर्वी नक्की फाइल करा. कारण, ३१ मार्चनंतर आयकर विभाग तुमचा आयटी रिटर्न स्विकारणार नाही.३) लागू शकते पेनल्टीजर तुम्ही काही कारणास्तव २०१५-१६ या वित्तिय वर्षामध्ये टॅक्स रिटर्न ३१ मार्चपूर्वी फाइल केला नाही तर तुम्हाला ५००० रुपयांची पेनल्टी लागू शकते. ४) एनपीएसएनपीएस टियर १ अकाउंट होल्डर्ससाठी महत्वाचं आहे की, त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात १००० रुपये डिपॉझिट करावे. ज एनपीएस टियर १ अकाउंट होल्डर्सने असे केले नाही तर त्यांचं अकाउंट ३१ मार्चपूर्वी फ्रिज होईल.५) पीपीएफ अकाउंटपीपीएफ अकाउंटमध्ये पेनल्टीपासून वाचण्यासाठी तुम्हाचं वार्षिक योगदान कमीत कमी ५०० रुपये असायला हवं. जर तुम्ही असं करु शकला नाहीत तर तुम्हाला ५० रुपयांची पेनल्टी द्यावी लागेल. पीपीएफ अकाउंटमध्ये ५०० रुपये डिपॉझिट करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.