शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 6:40 PM

1 / 10
प्रसिद्ध बॉलिवुड फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जीने डिझाइन केलेले ब्राइडल ड्रेसेस वेअर करण्याचं स्वप्न प्रत्येक मुलीचं असतं. इतकचं नाही तर सब्यासाचीच्या डिझायनर आउटफिट्सचे फॅन्स फक्त देशातच नाही तर विदेशातही आहेत. सब्यासाचीच्या ड्रेसेसची विशेषता म्हणजे त्याच्या प्रत्येक ड्रेसमध्ये तुम्हाला इंडियन ट्रेडिशनची झलक पहायला मिळते. फक्त ड्रेसच नाही तर त्याचं ज्वेलरी कलेक्शनही फार सुंदर असून त्याला रॉयल टच असतो. दीपिका, प्रियांका आणि अनुष्का व्यतिरिक्तही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या लग्नामध्ये सब्यासाची कलेक्शन वेअर केले होते. फक्त लग्नातच नाही तर अनेक इव्हेंट्समध्येही सेलिब्रिटी सब्यासाचीच्या कलेक्शनमध्ये दिसून येतात.
2 / 10
अनुष्का शर्माने आपल्या लग्नामध्ये सब्यासाची मुखर्जीचं ज्वेलरी कलेक्शन वेअर केलं होतं.
3 / 10
ईशा अंबानीने आपल्या वेडिंग फंक्शन दरम्यान सब्यासाची कलेक्शन वेअर केलं होतं.
4 / 10
बॉलिवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने आपल्या शाही लग्नामध्ये डिझायनर सब्यासाची मुखर्जीने डिझाइन केलेल्या रेड कलरच्या लेहेंग्यासोबत हेरिटेज ज्वेलरी वेअर केली होती. सब्यासाचीने डिझाइन केलेली मुगल स्टाइल 22 कॅरेट गोल्ड ज्वेलरीमध्ये अनकट डायमंड, पन्ना, जेपनिस कल्चर्ड पर्लचं वर्क पाहायला मिळालं.
5 / 10
दीपिका पादुकोणने बंगळुरू रिसेप्शन दरम्यान डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केलेल्या कांजीवरम गोल्डन साडीसोबत हेरिटेज ज्वेलरी कॅरी केली होती. दीपिकाने सब्यासाचीने डिझाइन केलेला रियर कोलंबियाई पन्ना, रोज-कट डायमंड चोकर नेकलेस आणि ईयरिंग्ज परिधान केल्या होत्या. हे सर्व दागिने दीपिकाल शाही लूक देत होते.
6 / 10
बॉलिवुड फॅशनिस्टा सोनम कपूरच्या लग्नामध्ये आलियाने सब्यासाचीने डिझाइन केलेली ज्वेलरी वेअर केली होती. आलियाने नियॉन ग्रीन कलरच्या लेहेंग्यासोबत स्टेटमेंट चकोर नेकलेस आणि मांग टिका कॅरी केला होता. ज्यामध्ये ती सुंदर दिसत होती.
7 / 10
करिश्मा कपूरने फ्लोरल प्रिंटेड लेहेंग्यासोबत सब्यासाचीने डिझाइन केलेली हेरिटेज ज्वेलरी कॅरी केली होती. डायमंड पर्ल आणि पर्ल चोकरमध्ये तिने आपल्या ग्लॅमर्स लूक फ्लॉन्ट केला होता.
8 / 10
अनुष्का शर्माने ब्लॅक ट्रेडिशनल कुर्त्यासोबत डिझायनर सब्यासाची मुखर्जीने डिझाइन केलेले 22 कॅरेट गोल्ड पोल्की ईयरिंग्ज परिधान केले होते.
9 / 10
दीपिकाने लग्नासाठी सब्यासाची ज्वेलरी डिझाइन्सची निवड केली होती.
10 / 10
बॉलिवुड क्वीन कंगना राणौत डिझायनर सब्यासाचीच्या ज्वेलरी कलेक्शन आणि ड्रेसेसची फॅन आहे. तिने ग्रीन कांजीवरम साडीसोबत विंटेज साउथ इंडियन चोकर आणि इयरिंग्ज कॅरी केल्या होत्या. कंगनाने वेअर केलेली ही ज्वेलरी 22 कॅरेट गोल्ड, बर्मा रूबी, जाम्बियन पन्ना आणि रियर बसरासोबत डिझाइन केली होती.
टॅग्स :Sabyasachiसब्यसाचीbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीDeepika Padukoneदीपिका पादुकोणPriyanka Chopraप्रियांका चोप्राKarisma Kapoorकरिश्मा कपूरKangana Ranautकंगना राणौतAnushka Sharmaअनुष्का शर्माAlia Bhatअलिया भट