- सारिका पूरकर-गुजराथीस्वयंपाकघरातील चमचा-विळीपासून तर कढई, ताटं-वाट्या, पेले, तांबे, सराटे, झारे, सोलणं, तवे, पोळपाट-लाटणे, पातेली या साऱ्या भांड्यांनी मेकओव्हर केलाय. भरपूर, असंख्य नवनवीन आकार, प्रकारात ती उपलब्ध झाली आहेत. भांडीच नाही तर मिक्सर, ग्लास कूकटॉप, इंडक्शन शेगडी, ओवन, मायक्रोवेव्ह, ंराईस कूकर्स, फूडप्रोसेसर या इलेक्ट्रिक वस्तूंमध्येही अत्याधुनिक सोयी बघायला मिळताहेत. यासोबतच कडधान्यांना मोड आणणारे स्प्राऊट मेकर्स, पॉपकॉर्न फोडणारे पॉपकॉर्न मेकर, सॅलॅड आणि भाज्या कापणारे विविध आकारातील चॉपर्स, फेसाळणारी कॉफी बनवणारे कॉफी मेकर्स, काळीमिरी पूड करणारे पेपर क्रशर, पास्ता-नूडल्स मेकर, लसूण-मिरची क्रशर वगैरे वगैरे.. यादी बरीच लांबलचक आहे. स्वयंपाकघराला २१ व्या शतकाचा साज चढला आहे. साहजिकच प्रत्येक महिलेलाच आपल्या किचनमध्ये ही व्हरायटी हवी असते. एकतर या साधनांमुळे तिचे कष्टही काही प्रमाणात कमी झालेय शिवाय किचनला एक फ्रेश आणि मॉडर्न लूकही मिळाला आहे. किचनच्या या मॉडर्न लूकमध्ये आणखी भर घालणारे काही भन्नाट प्रकार दाखल झाले आहेत ते तुम्हाला माहित आहेत का? हे ही तुमच्या खूप कामास येवू शकतात.बर्ड फोर्कमिठाई, फळांचे तुकडे खाण्यासाठी एरवी टूथपिक किंवा फोर्क वापरतात. स्टीलचे तेच ते फोर्क पाहून कंटाळले असाल तर फूड ग्रेड प्लास्टिकचे फोर्क बाजारात नवीन रुपात दाखल झाले आहेत. हे फोर्क कलरफूल आहेत शिवाय यांचे हॅण्डल म्हणून पक्ष्यांचे आकार आहेत, म्हणून ‘बर्ड फोर्क’ म्हणून ते ओळखले जाताहेत. शिवाय हे फोर्क ठेवण्यासाठी झाडाच्या आकाराचे स्टॅण्डही सोबत आहे. काम झालं की हे फोर्क या स्टॅण्डवर लावून ठेवले की झाडावर बसलेले रंगीबिरंगी पक्षीच आपल्याला दिसतात. डायनिंग टेबलवर हा बर्ड फोर्कचा स्टॅण्ड ठेवला की टेबललाही खूप फ्रेश लूक मिळतो. फोर्कप्रमाणेच कार्टून स्पून्सही आले आहेत. कार्टून कॅरॅक्टरचे हॅण्डल या स्पूनसाठी आहे. एलईडी ग्लाससध्या एलईडीचा जमाना आहे. मग किचन त्यास अपवाद कसं राहील. आता बाजारात सरबत, पाणी सर्व्ह करण्यासाठी खास एलईडी ग्लास उपलब्ध झाले आहेत. या ग्लासमध्ये पाणी, सरबत ओतले की लगेच त्यातील रंगीत बल्ब पेटतात आणि ग्लास विविध रंगांनी चमकू लागतो. साहजिकच आतील पाणी, सरबत देखील छान रंगीत चमकू लागते. पाणी संपलं की हे बल्बही विझतात. आहे ना मॅजिक. प्लॅस्टिकच्या पारदर्शक ग्लासच्या तळाशी हे दिवे बसवलेले असतात. रात्रीचे विवाहसोहळे, पार्टीज यासाठी हे ग्लास खूप छान पर्याय आहेत. कॉपर टिफिनतांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं हे आरोग्यासाठी लाभदायक आहे. तांब्याच्या अर्कामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. या धातूची आरोग्यासाठीची उपयुक्तता आता पुन्हा नव्याने साऱ्यांच्या लक्षात येऊ लागली आहे. म्हणूनच बाजारात आता तांब्याचे कोटिंग असलेले टिफिन बॉक्स दाखल झाले आहेत. ४-५ तास अन्न गरम ठेवणारे तसेच लिकप्रूफ टिफिन बॉक्स म्हणूनही ते ओळखले जातात. या टिफिनला सर्वोत्तम दर्जाचे तांब्याचे कोटिंग करण्यात आलं आहे. आकारही गोलाकार, चौकोनी नाही तर ओव्हल आणि मोठा आहे. तसेच या टिफिनबरोबर टेबलमॅट, नॅपकिन, काटे-चमचा असा लवाजमाच उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामुळे आॅफिसमध्येही घरच्यासारखे आरामदायी लंच घेणं शक्य होणार आहे. कॉपर टिफिनप्रमाणेच कॉपर थर्मासही आता उपलब्ध झाले आहेत. फ्रूट स्पंज महागडे काचेची तसेच स्टीलची भांडी, डिनर सेट स्वच्छ करण्यासाठी मऊ घासणी किंवा स्पंजचा तुकडा आपण वापरत आलोय. आता या स्पंजच्या घासणीने देखील कलरफूल लूक धारण केलाय. फळांच्या आकारात ही स्पंजची घासणी बाजारात दाखल झालीय. स्ट्रॉबेरी, संत्री, आंबा, मेलन या फळांच्या स्लाईसच्या आकाराची ही घासणी दिसायला सुंदर, कलरफूल तर आहेच शिवाय चांगल्या दर्जाचे स्पंज यात वापरले गेले आहे, जे भांड्यांचे चिकट डाग कमी करण्यासाठी मदत करते. अशा या स्टायलिश स्पंजनं मग भांडी घासतानाही मजा येईल नाही?ही सर्व उत्पादनं बाजारात कुठे मिळतील म्हणून दुकानं धुंडाळत बसण्याची गरज नाही ही सर्व उत्पादनं आॅनलाईनही सहज उपलब्ध आहेत.