- मोहिनी घारपुरे - देशमुखपॉम पॉम आणि टू टू.. आता यावरून तुम्हाला काय कळलं असेल? पॉम पॉम आणि टू टू हे लहान मुलांच्या कपड्यांच्या फॅशनच्या ट्रेण्डचं नाव आहे. सध्या ही फॅशन एकदम इन आहे. चिमुकल्या मंडळींसाठी बनविल्या जाणाऱ्या कपड्यांमधले हे दोन प्रकार आहेत.पॉम पॉम आणि टू टू आपल्याकडे वापरले जाणारे गोंडे लावलेले कपडे म्हणजे पॉम पॉम. वेगवेगळ्या आकर्षक रंगाचे लोकरीचे गोंडे किंवा रंगीत कापडांचे बॉल्स लावलेले फ्रॉक, स्कर्ट म्हणजे पॉम पॉम. तर टू टू म्हणजे नेटच्या पारदर्शक कापडापासून बनवलेले कपडे. हे कपडे लहान मुलामुलींना इतके सुंदर आणि लोभस दिसतात की त्यांचे गोंडस रूपडे या कपड्यांमुळे फारच खुलून दिसते. हे कपडे बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेतच पण तुम्ही स्वत:देखील तुमच्या घरातील चिमुकल्यांच्या फ्रॉकवर हे पॉम पॉम स्वत:च्या हातानं तयार करून लावू शकता. नेटवर सर्च केलं तर त्याचं प्रात्यक्षिकही सहज उपलब्ध होतं.टू टू स्कर्ट तर इतक्या वेगवेगळ्या रंगामध्ये आणि स्टाइलमध्ये आहेत की विचारू नका. एकंदरीतच चिमुकल्यांच्या जगतातील पॉम पॉम आणि टूटू कपड्यांची फॅशन सध्या फारच इन आहे. इतकं च नाही तर पॉम पॉम म्हणजे गोंडे लावलेले शूज, चप्पल्स, बेल्ट्स इतकच नव्हे तर अगदी कानातले, गळ्यातले अशा एक्सेसरीज देखील खूपच इन आहेत. काही किशोरवयीन मुलीही या एक्सेसरीज आवडीनं घालून मिरवतात. तर तरूण मुलामुलींसाठीही हे गोंडे लावलेले कपडे बाजारात उपलब्ध आहेत. काही मंडळी ते आपापल्या आवडीप्रमाणे वापरतातही. मात्र असं असलं तरी पॉम पॉम आणि टू टू ची फॅशन आहे ती चिमुकल्यांसाठीच! आपल्या चिमुकल्यांच्या वॉर्डरोबमध्ये हे पॉम पॉम आणि टूटू कपडे असायलाच पाहिजेत.