शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

४२व्या वर्षी Mrs. India Universe बनली कर्नलची पत्नी, १९ वर्षांची आहे मुलगी. पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 4:03 PM

1 / 7
लग्नानंतर भारतीय महिलांचे लक्ष सर्वसाधारणपणे कुटुंब आणि संसाराकडेच अधिक जाते. अनेक अशा महिला आहेत ज्यांनी लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्याने आणि मुलांच्या जन्मानंतर करिअर सोडले. तर काही कुटुंब अशी आहेत ज्यांनी लग्नानंतरही आपल्या सुनेला तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पाठिंबा देतात.
2 / 7
आज आम्ही अशा एका महिलेबाबत माहिती देणार आहोत, जिने लग्नानंतर सुमारे २२ वर्षांना आपलं स्वप्न पूर्ण केलं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला तिच्या कुटुंबानं खूप मदत केली. फॅशन फिल्डमध्ये नाव कमवायचं, असं या महिलेचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. आता तिने ४२ व्या वर्षी मिसेस इंडिया युनिव्हर्सचा पुरस्कार जिंकून हे स्वप्न साकार केली.
3 / 7
मिसेस इंडिया युनिव्हर्सचा पुरस्कार पटकावणाऱ्या या महिलेचं नाव आहे श्वेता जोशी. प्रसारमाध्यमांशी बोलताना श्वेता यांनी सांगितले की, माझा जन्म अमृतसरमध्ये झाला होता. तसेच माझे शालेय शिक्षणसुद्धा अमृतसरमध्येच झाले. लग्नानंतर मी बी.एड. केले. माझ्या पतींची पोस्टिंग हैदराबादमध्ये आहे. त्यांचं नाव कर्नल रमन ढाडा आहे. माझ्या पतींनी प्रत्येक परिस्थितीत मला सपोर्ट केला, तसेच माझ्यासोबत उभे राहिले.
4 / 7
श्वेता यांनी सांगितले की, माझ्या मनामध्ये सुरुवातीपासून फॅशन फिल्डमध्ये जाण्याची उत्सुकता होती. मी लग्नानंतर आर्मीच्या इव्हेंट्समध्ये अनेकदा सहभाग घेतला होता. मात्र वैयक्तिकरीत्या ही माझी पहिली स्पर्धा होती. त्यामध्ये पहिल्यांदाच मला मिसेस इंडिा युनिव्हर्स २०२२चा पुरस्कार मिळाला.
5 / 7
श्वेता यांनी सांगितलं की, माझी मुलगी १९ वर्षांची आहे. तर मुलगा १५ वर्षांचा आहे. मी या फिल्डमध्ये येण्यासाठी खूप आधीपासून इच्छुक होते. मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मी सुरुवातीला त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र या फिल्डमध्ये काही ना काही करायचं ही गोष्ट माझ्या मनात होती. जेव्हा मला या स्पर्धेबाबत समजले तेव्हा मी जयपूरमध्ये आयोजित मिसेस इंडिया युनिव्हर्स २०२२ पेजेंटमध्ये भाग घेतला. फायनल इव्हेंटच्या दिवशी मला प्लॅटिनम कॅटॅगरीतील विजेता घोषित करण्यात आले.
6 / 7
श्वेता यांनी सांगितले की, मी ८ वर्षांपूर्वी फिटनेसमध्ये सर्टिफिकेशन केले होते. त्यानंतर मी आर्मी कँटमध्ये लष्करी अधिकाऱ्यांच्या कुटुंबांनाही ट्रेनिंग देते. मी फिटनेसबाबत नेहमी जागरुक असते. त्यामुळे मला फिट राहणे आणि त्याबाबत वाचण्यास खूप आवडते.
7 / 7
आता मला हा पुरस्कार मिळाला आहे, तेव्हा मी कुठल्यातरी एनजीओमध्ये सहभागी होऊ इच्छिते. तसेच फिटनेसबाबत महिलांना जागरुक करू इच्छिते.
टॅग्स :fashionफॅशनIndian Armyभारतीय जवानWomenमहिलाCelebrityसेलिब्रिटी