हवाई प्रवास हा नेहमीच लक्झुरिअस अनुभव असतो. आपल्या प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्या यासाठी हवाई वाहतूक करणाºया कंपन्या सतत प्रयत्न करीत असतात. यातही बोर्इंग विमानातील बिझनेस क्लासने विमान प्रवासाची नवी परिभाषाच तयार केली आहे. हवाई प्रवास करताना सर्वसोयी युक्त पण महागडे लक्झरी केबिन्स प्रदान करणाºया एअरलाईन्सची ही माहिती...सिंगापूर एअरलाईन्स जगातील सर्वोत्कृष्ट हवाई सेवा प्रदाण करणाºया सिंगापूर एअरलाईन्सच्या दोन सिट्सच्या सूईटस्मधून प्रवास करण्यासाठी 3,75,000 हजार ते 16,00,000 रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो. महागडी वाईन्स, स्पा, सर्वोत्कृष्ट अन्न यासह अनेक विशेष व गोपनीय सेवा प्रवाशांना प्रदान केल्या जातात. एतिहाद डायमंड फर्स्ट क्लास फ्रॉम अबू धाबी टू वर्ल्ड अशी टॅगलाईन असलेल्या एतिहाद एअरलाईन्सने प्रवासांना चांगल्या सुविधा देता याव्या यासाठी डायमंड फर्स्ट क्लाची बुकिंग सुरू केली आहे. एतिहादच्या डायमंड फर्स्ट क्लासमधून प्रवास करण्यासाठी 40 हजार ते 3 लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. प्रवाशांचे स्वागत बेल्गीअम चॉकलेटस्चे गिफ्ट पॅक देऊन केले जाते. अमिरात फर्स्ट क्लास सुईट्सअमिरात एअरलाईन्सचे फर्स्ट क्लास केबिन्स इतरांच्या तुलनेत अधिक मोकळे आहेत. येथे प्रवाशांना ‘बुल्गारी’ची सुविधा किट दिली जाते. येथील मिश्र व्यजंन टेस्टी आहेच शिवाय प्रवाशांसाठी असणारे बाथरूमही एक वेगळी अनुभूती प्रदान करणारे आहे. प्रवाशांच्या मद्यानंदासाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. एएनए फर्स्ट स्केअर अमिरातच्या तुलनेत येथे जागा कमी असली तरी मोकळा श्वास घेण्यासाठी मोठी जागा व लांबलचक पादचारी मार्ग प्रवाशांना आनंद देणारा ठरतो. केवळ तुमच्या एका विनंतीवर तुमच्यासमोर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मेन्यूकार्ड मधील कोणतेही फूड तुम्ही मागवू शकता. प्रवाशांना दिले जाणारे डेर्झट हे सर्वोत्तम आहे.कतार एअरवेज बिझनेस क्लासयातील बिझनेस क्लासमधील दोन सिट्स दरम्यान फारसे अंतर नाही. हे एखाद्या सामान्य क्लास प्रमाणेच आहे. मात्र प्रवाशी स्वत:ची वेगळी सोय करू शकतात. मोकळी जागा हे या क्लासचे वैशिष्ट. प्रत्येक प्रवाशासाठी मोठा एलसीडी टीव्ही लावला आहे. प्रवाशांसाठीचे बाथरूम पॉश आहे. वाय-फाय सुविधेसाठी मात्र जास्तीचे 20 डॉलर खर्च करावे लागतात.एअर फ्रान्स ए 380 फर्स्ट क्लास एअर फ्रान्सच्या प्रत्येक विमानातून केवळ 9 प्रवाशांना फर्स्ट क्लास सुविधा प्रदान केल्या जातात. काही सिट्स एकल आहेत तर काही जोडीच्या आहेत. केवळ प्रायव्हेसीवर जाऊ नका कारण प्रत्येक सिटमध्ये म्यॅनुली बदल करता येतो. प्रवाशांना सुविधा किट, पायजामा, बोस हेडफोन्स आणि स्लिपर्स दिल्या जातात. हसतमुख चेह-यांच्या हवाई सुंदरी तुमचा आनंद द्विगुणीत करतात. जेट ब्लयू मिंट क्लास जेट ब्लयू मिंट क्लासचा प्रवास सर्वांत आनंददायी म्हणावा असाच आहे. प्रवाशांना देण्यात येणा-या फू डवर सर्वाधिक भर दिला जातो. सिट्स मोठ्या व वेग-वेगळया आहेत. प्रत्येक सिट कॅबिन बनावी यासाठी दरवाजा दिला आहे. दरवाजा बंद केल्यावर प्रवाशी अधिक मोकळीक मिळवू शकतात.